पुणोकरांच्या ‘अपेक्षा’-एक्स्प्रेसची निराशा
By admin | Published: July 9, 2014 12:00 AM2014-07-09T00:00:43+5:302014-07-09T00:00:43+5:30
‘अच्छे दिन आनेवाले हैं’ असे म्हणत मोदी सरकारने पहिला रेल्वे अर्थसंकल्प जाहीर केला असला, तरी यामध्ये महाराष्ट्र आणि पुणोकरांच्या फारशा अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत.
Next
पुणो : ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ असे म्हणत मोदी सरकारने पहिला रेल्वे अर्थसंकल्प जाहीर केला असला, तरी यामध्ये महाराष्ट्र आणि पुणोकरांच्या फारशा अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. पुणो-मुंबईकरिता विशेष रेल्वे आणि सुविधांची अपेक्षा ठेवणा:या प्रवाशांची निराशा झाली. तसेच दौंड, नाशिकसारख्या मार्गावरही कोणतीही नवी घोषणा झालेली नाही. त्यामुळे पुणोकरांच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार पुन्हा एकदा झाला आहे.
‘‘मागील 1क् वर्षात अनेक नवनवीन घोषणा झाल्या, परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. रेल्वेमंत्री दक्षिण भारतातील असल्याने कर्नाटक, आंध्रप्रदेशसारख्या राज्यांना झुकते माप दिले आहे. किमान अर्धवट सोडलेले प्रकल्प आणि घोषणा पूर्ण व्हाव्यात, ही अपेक्षा आहे.’’
- माणिक बिर्ला
पुणोकरांसाठी अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प आहे. नव्या प्रयोगांची घोषणा झाली असली, तरी मुंबई, पुणो, दौंड, नाशिककरिता नव्या घोषणा झालेल्या नाहीत. दौंड-नाशिक रुळांचे दुहेरीकरण झालेले नाही. तरी प्रवासी संघटना गप्प बसणार नाहीत. प्रवाशांसाठीचा लढा सुरू राहील.
-कन्नुभाई त्रिवेदी
अध्यक्ष, पुणो प्रवासी संघ.
पुणो-मुंबई मार्गावर दररोज प्रवास करणा:या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सकाळी 1क् वाजेर्पयत मुंबईमध्ये पोहोचणारी विशेष गाडी सुरू करावी, अशी मागणी कित्येक महिन्यांपासून केली जात आहे. परंतु, त्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. सीझन तिकिटांच्या दरात वाढ नसल्याने दिलासा मिळाला आहे.
-मांगीलाल सोळंकी
उपाध्यक्ष, पुणो-मुंबई रेल्वे संघ.
सुरक्षा, स्वच्छतेला प्राधान्य. रेल्वेचा हा अर्थसंकल्प चांगला असून त्यात सुरक्षा, स्वच्छता, आधुनिकीकरण यावर भर देण्यात आला आह़े जुन्या योजना पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आह़े ‘बुलेट ट्रेन’; तसेच उत्तम प्रशासनावर भर दिला असून, त्यामुळे मोठा बदल दिसून येईल़ त्यातून सामान्य प्रवासी खूष होईल़
अनिल शिरोळे,
खासदार.
नव्या सरकारची नुकतीच सुरुवात आहे. पुणो, सोलापूर, नाशिक परिसरातील तिस:या लाइनकरिता घोषणा झालेली नाही. तसेच, पुणो-दौंड मार्गाच्या विकासाकरिता कोणताही निधी देण्यात आलेला नाही. एक्स्प्रेसकरिता थांबे वाढविणो, आरपीएफच्या जवानांच्या संख्येत वाढ करणो आदी चांगल्या घोषणा आहेत.
-हेमंत टपाले
अध्यक्ष, पुणो-मुंबई रेल्वे संघ.
‘बुलेट ट्रेन’मधून पुणो का वगळले?
पुणो-मुंबई-अहमदाबाद या ‘बुलेट ट्रेन’बाबत फ्रान्स निगमबरोबर 13 फेबुवारी 2क्13 रोजी करार करण्यात आला होता़ असे असताना, मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ची घोषणा करताना, त्यातून पुणो का वगळण्यात आले, मोदींनी ‘अच्छे दिन आयेंगे’ असे म्हटले होत़े नवे तंत्रज्ञान, चांगले बदल होतील असे वाटले होत़े सर्वाना खूष करता येणार नाही, याची आम्हाला कल्पना आहे; पण फूल ना फुलाची पाकळी तरी मिळेल असे वाटले होत़े वर्ल्ड क्लास स्टेशन म्हणून पुणो रेल्वे स्टेशनला निधी मिळणो गरजेचे होते; पण त्याबाबत निराशा झाली़
-हर्षा शहा, अध्यक्षा, पुणो प्रवासी ग्रुप.
कजर्त ते लोणावळा चौथी लेन आणि अहमदाबाद-चेन्नईसारख्या गाडय़ांमुळे गुजरातला जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात स्वच्छतेच्या दृष्टीने पाऊल उचलले असून, काही प्रमाणात समाधानकारक आहे.
-सतीश शहा
सेक्रेटरी, पुणो प्रवासी संघ.
प्रवासी व मालवाहतूक दरवाढीत काही सवलत मिळावी, अशी सामान्यांची अपेक्षा फोल ठरली. पुणो-मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ची संकल्पना 1996 मध्ये आली होती. आता विविध सर्वेक्षणानंतर हा प्रकल्प मार्गी लागत आहे. आधुनिकीकरणासाठी खासगीकरणाला वाव देण्यात आला असला, तरी सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू राहायला हवा.
-सुरेश कलमाडी,
माजी रेल्वे राज्यमंत्री.
माळशेज रेल्वे, नाशिक-पुणो रेल्वेबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा होती. परंतु, निराशा झाली आहे. दौंड-पुणो विद्युतीकरणाबाबत ठोस आश्वासन देण्यात आले नसल्यामुळे लोकप्रिय घोषणा करून लोकांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचा अर्थसंकल्प सामान्य प्रवाशांसाठी निराशाजनक आहे.
-सुप्रिया सुळे,
खासदार.
स्टेशनच्या रांगा होणार कमी
पुणो : अचानक प्रवास करायचा असेल; तसेच नातेवाइकांना रेल्वे स्टेशनवर सोडायला अथवा आणायला जायचे असेल, तर प्लॅटफॉर्म तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबायची आता गरज राहणार नाही़ इंटरनेटवरूनच अनारक्षित तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याची सोय उपलब्ध होणार आह़े त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील खिडक्यांसमोरील रांगा कमी होणार आहेत़
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात इंटरनेटवर प्लॅटफॉर्म तिकीट आणि अनारक्षित तिकिटांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आह़े पुणो शहर हे ‘आयटी हब’ म्हणून ओळखले जात असून, इंटरनेटमार्फत तिकीट आरक्षणाचे प्रमाण येथे सर्वाधिक आह़े पुणो रेल्वे स्टेशनवरून दररोज सरासरी 25 हजार अनारक्षित तिकिटे काढली जातात व त्यावरून 4क् हजार प्रवासी प्रवास करतात़ पुणो रेल्वे विभागात दररोज सरासरी 79 हजार 35क् अनारक्षित तिकिटावरून 1 लाख 82 हजार 5क्क् प्रवासी प्रवास करीत असतात़ या प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर जाऊन अथवा जवळच्या जनआरक्षण तिकीट खिडकीवर जाऊन रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागत़े अनेकदा ऐनवेळी आलेल्या प्रवाशांना रांगेत उभे असतानाच गाडी आल्यामुळे, ते नाइलाजाने तिकीट न काढता, तसेच विनातिकीट प्रवास करतात़ टीसीकडून पकडले गेल्यास, किमान 25क् रुपये दंड भरावा लागतो़
एकटय़ा पुणो रेल्वे स्टेशनवर दररोज 9 हजार प्लॅटफॉर्म तिकिटे काढण्यात येतात़ पुणो विभागात ही संख्या 1क् हजार इतकी आह़े लांबच लांब रांगेत उभे राहण्यापेक्षा अनेक जण प्लॅटफॉर्म तिकीट न काढता, तसेच प्लॅटफॉर्मवर जातात़ त्यामुळे 5 रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकीटासाठी 255 रुपये दंड भरण्याची पाळी त्यांच्यावर येत़े (प्रतिनिधी)
4पुणो रेल्वे स्टेशनवरून दररोज सरासरी 25 हजार विनाआरक्षित तिकिटे काढली जातात़ त्यावरून 4क् हजार प्रवासी प्रवास करतात़
4पुणो रेल्वे विभागात दररोज सरासरी 79 हजार 35क् विनाआरक्षित तिकिटावरून 1 लाख 82 हजार 5क्क् प्रवासी प्रवास करतात.
4पुणो रेल्वे स्टेशनवरून दररोज 9 हजार, तर विभागातून 1क् हजार प्लॅटफॉर्म तिकिटे काढली जातात़