Rafale Deal : तांत्रिक मुद्दे सोडून राफेलची किंमत सांगायला हरकत नाही - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 05:26 PM2018-09-25T17:26:49+5:302018-09-25T18:13:08+5:30
उदयनराजेंना तिकीट देऊ नका अशी कोणत्याही नेत्याची मागणी नाही.
पुणे : राफेल विमान खरेदी देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. मी देखील संरक्षणमंत्री होतो, त्यामुळे राफेल खरेदीची तांत्रिक माहिती न देता किंमत सांगायला काहीच हरकत नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात व्यक्त केले.
पुण्यात दिवंगत हिंद केसरी गणपत आंदळकर यांच्या श्रद्धांजली सभेला त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले की, सरकार ही माहिती गोपनीय असल्याचा दावा करत आहे. तंत्रज्ञानाचा भाग सोडून किंमत जाहीर करणे गरजेचे आहे. बोफोर्स प्रकरणात भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि इतर नेत्यांनी अशाच प्रकारची मागणी केली होती. यामुळे यामध्ये गैर काही नाही.
I think there is no harm in disclosing the price. I was in the Parliament when during UPA, Rafale issue was raised and at that time they (BJP) including Sushma Swaraj used to demand that all information should be disclosed: Sharad Pawar, NCP pic.twitter.com/x3DZpnde4a
— ANI (@ANI) September 25, 2018
उदयनराजे यांच्या खासदारकीच्या उमेदवारीला पक्षातून विरोध असल्याचे विचारल्यावर, पवार म्हणाले की, उदयनराजेंना तिकीट देऊ नका अशी कोणत्याही नेत्याची मागणी नाही. लवकरच माझ्या वेळेप्रमाणे सर्वांची एकत्र बैठक घेऊन निर्णय घेईन, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
कुस्तीला चांगले दिवस येण्याची गरज आहे. प्रो-कब्बडी लीगचा फायदा होऊ शकतो. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही पवार म्हणाले.