राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 04:07 AM2017-10-29T04:07:31+5:302017-10-29T04:29:23+5:30

कधी-कधी दलितांच्या घरी जेवण करणा-या राहुल गांधी यांनी दलित समाजातील मुलीशी विवाह करून नवा पायंडा पाडावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

Rahul Gandhi should marry a Dalit girl - Ramdas Athavale | राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे - रामदास आठवले

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे - रामदास आठवले

Next

अकोला : गुजरात निवडणुकीत राहुल गांधींसोबत असलेल्या कुणाचाही काहीच परिणाम होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे कुणाचाही टिकाव लागणार नाही. जनतेचा कौल मोदींनाच मिळेल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केला. विविध कार्यक्रमानिमित्त अकोल्यात आल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुजरात निवडणुकीबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, भारिप-बमसंचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही गुजरातमध्ये तळ ठोकला. त्याचवेळी आपणही तेथे प्रचारात उडी घेणार आहोत. त्यामुळे अ‍ॅड. आंबेडकर यांचा प्रभाव मोडीत निघेल, असा दावाही त्यांनी केला.
भाजपाचे स्वतंत्र विदर्भ निर्मितीचे धोरण आहे. विदर्भ वेगळा करण्याचा मोठेपणा त्यांनी दाखवावा, अशी पक्षाची मागणी आहे. विदर्भ वेगळा झाल्यानंतर दलित, बहुजन, अल्पसंख्यांकांची सत्ता येऊ शकते, असे ते म्हणाले.

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे
कधी-कधी दलितांच्या घरी जेवण करणा-या राहुल गांधी यांनी दलित समाजातील मुलीशी विवाह करून नवा पायंडा पाडावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

मायावतींचे बौद्ध धर्मांतरणाचे नाटक
मायावती सातत्याने बौद्ध धर्मात प्रवेश करण्याची भाषा करतात. त्या आंबेडकरवादी असतील तर खरोखरच बौद्ध धर्मात प्रवेश घेतील़

रिपाइं ऐक्यात नेतृत्व आणि युतीमुळे फूट
रिपाइंच्या ऐक्यात नेतृत्व कुणी करावे, युती किंवा आघाडी कोणत्या पक्षाशी करावी, या मुद्द्यांवरून नेहमीच फूट पडते. आता नेत्यांनी एकत्र यावे, नेतृत्वाचा निर्णय बहुमताने घ्यावा, अ‍ॅड. आंबेडकर यांचे नेतृत्व आधीपासूनच मान्य आहे. कोणताही निर्णय बहुमताने घेऊन अंमलबजावणी व्हावी, असे मतही आठवले यांनी व्यक्त केले. जनतेने रिपाइं ऐक्यासाठी आग्रही भूमिका घ्यावी, ऐक्य न करणाºया नेत्याला जिल्हाबंदी करावी, ऐक्यात अ‍ॅड. आंबेडकर यांचाच खोडा असल्याचे त्यांनी नाव न घेता सूचित केले.

Web Title: Rahul Gandhi should marry a Dalit girl - Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.