रेल्वे ट्रॅक अर्थसाह्य विषय फेटाळला

By Admin | Published: August 22, 2016 12:43 AM2016-08-22T00:43:38+5:302016-08-22T00:43:38+5:30

दोन रेल्वे लेनसाठी महापालिकेने २७५ कोटी रुपये द्यावेत, हा रेल्वे मंत्रालयाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आला.

Rail track finance subject refuses | रेल्वे ट्रॅक अर्थसाह्य विषय फेटाळला

रेल्वे ट्रॅक अर्थसाह्य विषय फेटाळला

googlenewsNext


पिंपरी : पुणे-लोणावळादरम्यान आणखी दोन रेल्वे लेनसाठी महापालिकेने २७५ कोटी रुपये द्यावेत, हा रेल्वे मंत्रालयाचा
प्रस्ताव सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आला.
रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासन यांच्या वतीने पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी आणि चौथी उपनगरीय रेल्वे लेन सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादनाव्यतिरिक्त २३०६ कोटी रुपये इतका खर्च येणार असून त्यामध्ये महाराष्ट्र शासन व रेल्वे मंत्रालयाचा समान हिस्सा असेल, असे ठरले आहे. राज्य शासनातर्फे द्यायची पन्नास टक्के रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाततर्फे दिली जाते, त्याचप्रमाणे रेल्वे लाइन प्रकल्पासाठीची ५० टक्के रक्कम पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे देण्याबाबत शासनाने आदेश दिले. महापालिका आणि प्राधिकरण यांनी आपापल्या हद्दीतील लांबीप्रमाणे देय असलेली ५० टक्के रक्कम देण्याबाबत कळविले.
या रेल्वे ट्रॅकसाठी येणाऱ्या एकूण २३०६ कोटी रुपये खर्चापैकी महापालिका हद्दीत होणाऱ्या रेल्वे ट्रॅकचा खर्च सुमारे ५५० कोटी रुपये आहे. रेल्वे ट्रॅकसाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम देण्यासाठी पालिका तयार असल्याचे रेल्वे विकास कॉपोर्रेशनला कळविले होते.(प्रतिनिधी)
>चर्चा नाहीच
पालिका हद्दीतील रेल्वे ट्रॅकसाठी येणाऱ्या राज्य शासनाच्या एकूण ५५० कोटी रुपये खर्चातील ५० टक्के अर्थात २७५ कोटी रुपये रक्कम पालिका राज्य शासनाला देय आहे. हा विषय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही चर्चा न करता फेटाळला.

Web Title: Rail track finance subject refuses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.