पाऊस ओसरला, पण वाहतूक कोंडी वाढली

By admin | Published: August 2, 2016 03:51 AM2016-08-02T03:51:18+5:302016-08-02T03:51:18+5:30

पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावून सोमवारी थोडी उसंत घेतली असली तरी शहराच्या विविध रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

Rain has gone, but the traffic deteriorate increased | पाऊस ओसरला, पण वाहतूक कोंडी वाढली

पाऊस ओसरला, पण वाहतूक कोंडी वाढली

Next


ठाणे : पावसाने रविवारी जोरदार हजेरी लावून सोमवारी थोडी उसंत घेतली असली तरी शहराच्या विविध रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे शहराच्या विविध भागांत सोमवारी कामाच्या पहिल्याच दिवशी वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र दिसून आले. कापूरबावडीवरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावर खड्ड्यांची संख्या वाढल्याने येथे रात्रीपासूनच वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
विशेष म्हणजे सोमवारी सकाळीदेखील जवळपास एक किमीपर्यंत वाहने उभी होती. केवळ पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहनांना पाऊण ते एक तासाचा कालावधी गेल्याने पहिल्याच दिवशी कामावर अनेकांचा लेटमार्क लागला.
रविवारी पाऊस जमके बरसल्याने शहराच्या विविध भागांत पाणी साचले होते. सोमवारी पावसाचा जोर ओसरला आणि शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांनी वाहनांचा वेग मात्र चांगलाच मंदावला. शहराच्या अनेक भागांत खड्डेच खड्डे दिसून आले. विशेष म्हणजे कापूरबावडीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ब्रिजवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने येथील वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे दिसून आले. चारपदरी घोडबंदरच्या एका लेनसह सर्व्हिस रोडवरही वाहनांच्या रांगा होत्या. परंतु, सर्व्हिस रोडवर असलेल्या खड्ड्यांमुळेदेखील वाहनचालक हैराण झाले होते. त्यामुळे मानपाडा ते कापूरबावडी असे केवळ पाच मिनिटांहून अधिकचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना पाऊण तासाहून अधिकच वेळ लागत होता.
>जेटपॅचरचा फंडाही अपयशी
पालिका वारंवार येथे खड्डे बुजवत आहे. परंतु, येथे जेटपॅचरचा फंडाही अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे स्टेशन ते जांभळीनाका या अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. परंतु, या रस्त्यावरदेखील आता खड्डे पडले आहेत. सॅटीसवरही खड्डे पडल्याने बसचा मार्गही काहीसा खडतर झाला आहे.

Web Title: Rain has gone, but the traffic deteriorate increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.