पुणे : आॅक्टोबर महिना सुरू झाला असूनही राज्यभरात बहुतांश ठिकाणी पावसाच्या धारा सुरूच आहेत. येत्या २४ तासांतही कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची, तर संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़ दरम्यान,रविवारी दिवसभरात औरंगाबाद, महाबळेश्वर, अमरावती येथे जोरदार पाऊस झाला. पुढील तीन दिवस कोकण, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बºयाच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ येत्या २४ तासांत कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ १० व ११ आॅक्टोबरला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.वीज कोसळून राज्यात पाच ठार-मुसळधार पावसासह विजांचे थैमान राज्यभर सुरू असून रविवारी दुपारी विविध ठिकाणी वीज पडून पाच जणांचा बळी गेला आहे. जळगावातील योगेश गणेश पवार (२२, ता. जामनेर) व पापालाल टिकाराम पवार (६०, ता. पारोळा) या दोन शेतकºयांचा शेतात काम करीत असताना वीज पडून मृत्यू झाला. तसेच बुलडाण्यातील नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे शेतात काम करणाºया सत्यभामा उकर्डा इंगळे (५२) यांचाही वीज पडून मृत्यू झाला. उस्मानाबादेतील वाशी-कन्हेरी माळरानावर जनावरे चारणाºया रमेश एकनाथ कवडे (५५) यांचा आणि जालन्यातील भोकरदन तालुक्यातील नांजा येथे शेतात काम करणाºया अर्जुन खरात (२२) यांचाही वीज प्रपाताने मृत्यू झाला.दुहेरी वातावरणाने मुंबईकर त्रस्त-शुक्रवारी दुपारी आणि शनिवारी सायंकाळी मुंबईत पावसाने विजांच्या कडकडाटासह मुसळधार हजेरी लावली. तत्पूर्वी दुपारी मात्र येथे कडाक्याचे ऊन पडले होते. रविवारीही पावसाने असाच कित्ता गिरवला. दुपारी पडलेल्या कडाक्याच्या उन्हानंतर सायंकाळी पावसाने पुन्हा उपनगरात काही ठिकाणी हजेरी लावली. दिवसा ऊन आणि सायंकाळी पाऊस अशा दुहेरी वातावरणाला मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे.
२४ तासांत पावसाची शक्यता! वीज कोसळून राज्यात पाच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 3:12 AM