पावसावरील बेटिंगने ४५० कोटींचे नुकसान
By admin | Published: June 27, 2015 02:06 AM2015-06-27T02:06:42+5:302015-06-27T02:06:42+5:30
क्रीडा सामने ते निवडणुकीपर्यंत विविध बाबीवर बेटिंग करणाऱ्या बुकीजना यावर्षी मान्सूनने चांगलाच फटका दिला असून, २६ जूनच्या सकाळपर्यंत मुंबईतील कुलाबा केंद्रात
डिप्पी वांकाणी, मुंबई
क्रीडा सामने ते निवडणुकीपर्यंत विविध बाबीवर बेटिंग करणाऱ्या बुकीजना यावर्षी मान्सूनने चांगलाच फटका दिला असून, २६ जूनच्या सकाळपर्यंत मुंबईतील कुलाबा केंद्रात ८६३ .३ मिमि पावसाची नोंद झाली आहे. बुकीनी जून महिन्यात जास्तीतजास्त ७०० मिमि पाऊस होईल असा अंदाज बांधून बेटिंग केले होते. पण चारच दिवसात कुलाबात ८६३.३ मि मि , तर सांताक्रूज केंद्रात ११०० मिमि पावसाची नोंद झाली. बुकी फक्त कुलाबा केंद्रातील पावसावर बेट लावतात. जूनमधील पावसाने फसगत केल्यानंतर बुकीनी आता जूनचे बेटिंग बंद केले असून, आता जुलैचे बेटिंग सुरु आहे.
बुकींच्या अंदाजानुसार जून महिन्यात मुंबईत ३०० ते ४०० मिमि पाऊस होतो. जुलै व आॅगस्ट महिन्यात ६०० ते ७०० मिमि व सप्टेंबर महिन्यात २०० ते ३०० मिमि होतो. पण यावर्षी जून महिन्यात डबल पाऊस झाल्याने बुकी चक्रावले आहेत.
बुकींचे पावसाचे अंदाज आता बदलले असून, या मोसमात मुंबईत २००० मिमि पाऊस होईल असे मानले जात आहे. मोठ्या बुकीनी आपल्या जमाखर्चाचा मेळ घातला आहे, पण छोट्या बुकीना अजूनही निधीची जमवाजमव करणे कठीण जात असून ते आता पुढच्या आठवड्यातच बेटिंगला सुरुवात करतील.
जुलैमधील अंदाज चुकला तर बुकीजचे साम्राज्य उधळण्यास वेळ लागणार नाही.