नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा ही काही महापालिकेची जबाबदारी नाही. केंद्र व राज्य सरकारने अद्याप निधीच वितरित केला नसल्याचे विधान नाशिक दौऱ्यात करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शहरातील तीनही भाजपा आमदार बरसले आहे. गोदापार्कवर फेरफटका मारण्यापेक्षा कुंभमेळ््याच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.मुख्यमंत्र्यांनी खर्चाचा ७५ टक्के भार उचलताना सत्ता कोणाची आहे, याचा विचार केला नाही. मात्र राज ठाकरे यांनी सिंहस्थाबाबत विशेष बैठक घेतल्याचे स्मरत नाही, असे भाजपा आमदार प्रा. देवयानी फरांदे म्हणाल्या. यंदा भाजपा सरकारने अर्थसंकल्पात सिंहस्थासाठी २,४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. माहिती न घेता विधाने करण्यापेक्षा ठाकरे यांनी कामे कशी लवकरात लवकर मार्गी लागतील, यावर भर द्यावा, असे आमदार बाळासाहेब सानप म्हणाले तर राज ठाकरे यांचे विधान बेजबाबदारपणाचे असल्याचे आ. सीमा हिरे म्हणाल्या. मनसेने गेल्या तीन वर्षांत जबाबदारी झटकल्याची पुष्टी त्यांनी जोडली.
नाशिकच्या आमदारांची राज ठाकरेंवर टीका
By admin | Published: April 04, 2015 4:14 AM