राज्यसभेसाठी वंदना चव्हाण, अनिल देसार्इंना पुन्हा संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 04:27 AM2018-02-28T04:27:28+5:302018-02-28T04:27:28+5:30
राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनेने अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली असताना मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही वंदना चव्हाण यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनेने अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली असताना मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही वंदना चव्हाण यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली.
राज्यसभेच्या एकूण ५८ जागा रिक्त होत आहेत. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण, डी.पी.त्रिपाठी, काँग्रेसचे रजनी पाटील, राजीव शुक्ला, शिवसेनेचे अनिल देसाई आणि भाजपाचे अजयकुमार संचेती या सहा सदस्यांचा समावेश आहे. रिक्त जागांसाठी २३ मार्च रोजी मतदान होणार आहे.
यासाठी शिवसेनेने अनिल देसाई तर राष्ट्रवादीने वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस पक्षाचा निर्णय अद्याप झालेला नाही. रजनी पाटील व राजीव शुक्ला पुन्हा प्रयत्नशील असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यसभेवर पाठविण्यात यावे,यासाठी काँग्रेसमधील एक गट प्रयत्न करत आहे.