कोरेगाव-भीमाच्या इतिहासाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा; रामदास आठवलेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2021 03:07 PM2021-01-01T15:07:14+5:302021-01-01T15:10:50+5:30

यावेळी दलित-सवर्ण मुद्द्यावर बोलताना आठवले म्हणाले, दलीत-सवर्णांना जोडण्यासाठी आणि दलितांवर होणारे अत्याचा थांबवण्यासाठी देशात समता यायला हवी. तसेच देशातील दलित आणि सवर्णांमधील गैरसमज दूर व्हायला हवेत.

Ramdas Athawale said Koregaon-bhima battle history will be included in textbooks | कोरेगाव-भीमाच्या इतिहासाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा; रामदास आठवलेंची मागणी

कोरेगाव-भीमाच्या इतिहासाचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा; रामदास आठवलेंची मागणी

Next
ठळक मुद्देकोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा.यासाठी आपण शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करू, असेही आठवले यांनी म्हटले आहे.दलीत-सवर्णांना जोडण्यासाठी आणि दलितांवर होणारे अत्याचा थांबवण्यासाठी देशात समता यायला हवी - आठवले

पुणे - कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हायला हवा. हा इतिहास पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाला, तर तो सर्व मुलांनाही कळेल, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. यासाठी आपण शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करू, असेही आठवले यांनी म्हटले आहे. आठवले यांनी शुक्रवारी कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

यावेळी दलित-सवर्ण मुद्द्यावर बोलताना आठवले म्हणाले, दलीत-सवर्णांना जोडण्यासाठी आणि दलितांवर होणारे अत्याचा थांबवण्यासाठी देशात समता यायला हवी. तसेच देशातील दलित आणि सवर्णांमधील गैरसमज दूर व्हायला हवेत. गावागावांत एकी निर्माण व्हायलहा हवी आणि गावात एकी निर्माण झाली, की देशाचा विकास झपाट्याने होईल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2021 मध्ये शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित आदिवासी, ओबीसी आणि सवर्ण या सर्वांना न्याय देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करेल, असेही आठवले यावेळी म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांना उत्तर -
प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी कोणताही ठोस प्लॅन नाही, असे म्हटले होते. यासंदर्भात पत्रकारांनी विचाले असता, आठवले म्हणाले, राज्याकडे कोणताही प्लॅन नाही, हे मला माहिती आहे. मात्र, अर्थव्यवस्था पट्रीवर आणण्यासाठी केंद्र सरकारकडे ठोस योजना आहे. आगामी बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर मदत केली जाईल.

‘मी रिपब्लिकन’ अशी आमची घोषणा -
नव्या वर्षाच्या संकल्पासंदर्भात विचारले असता, नव्या वर्षात आपण रिपब्लिकन पक्ष देशभरात मजबूत करण्याचा संकल्प केला आहे. ‘मी रिपब्लिकन’अशी आमची घोषणा असेल, असे आठवले म्हणाले.


 

Web Title: Ramdas Athawale said Koregaon-bhima battle history will be included in textbooks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.