सातारा : ‘रामराजेंच्या काळातील जलसंपदा विभागातील तीन चौकशा चालू आहेत. कोंडाणे धरणाप्रमाणेच निवकणे धरणाचीही चौकशी सुरू झाली आहे. अशा अनेक चौकशांचा ससेमिरा आता सुरू होणार आहे. तेव्हा, त्यांच्या या मर्कटलीलांचा जाब आम्ही शेतकरी हितासाठी विचारला तर त्यात वावगं काय? आम्ही नीरा-देवघरच्या पाण्याविषयी फलटणला बैठक घेणार समजल्यावर दूरभाषेवरून मध्यस्थांकरवी हा प्रश्न जास्त लावून धरू नका, अशी याचनाही याच रामराजेंनी केली,’ असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांनी एका पत्रकान्वये केला आहे.ते पुढे म्हणाले की, ‘सभापतिपदावर असताना तुम्हाला निवडणूक लढवता येते की नाही? ते माहिती आहे. तथापि, सभापतिपदाचा राजीनामा देऊन मग आम्हाला, निवडणुकीचे आव्हान दिले असते तर तुमच्यात अजून काही तरी राम दिसला असता. आपली खुर्ची आणि लाल दिवा सुरक्षित ठेवून, तुम्ही लढण्याची भाषा करीत आहात म्हणजे पडलं तरी तुमचा लाल दिवा सुरक्षित, नाक कापलं गेलं तरी भोके सुरक्षित अशी तुमची रावणाची सोयीस्कर चाल आहे.’‘अहो, राम-रघुनाथराव, लढण्याची तुमची शारीरिक ताकद आता राहिली आहे का? तरी सुध्दा खुमखुमी असेल तर आधी सभापती आणि विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि मग आव्हान देण्याची भाषा करा, असे आव्हान देणारे आमच्यापुढे नंतर नसलेली-असलेली शेपटं घालतात, असे कित्तेकवेळा झालेले आहे,’ असाही टोमणा शेवटी उदयनराजे यांनी मारला आहे.उदयनराजेंचे चार प्रश्ननीरा-देवघरचे पाणी वाटप नियोजन का बदलले ?१५-२० वर्षांत रकमा खर्च होऊनही सिंंचन का झाले नाही?पाणी शिवारात का पोहोचले नाही ? कृष्णा खोऱ्याच्या कामात प्रचंड अनियमितता का झाली ?(संबंधित बातमी पान २)रामराजेंची जहरी टीका : मी घाबरणार नाहीतरडगाव : ‘फलटण तालुक्याच्या विकासाशी काडीचा संबंध नसणाऱ्यांकडून छत्रपती नावाचं मार्केटिंग करून तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. तसेच माझ्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करू, अशी भीती दाखवली जात आहे. परंतु, सर्वसामान्य जनतेची ताकद माझ्या पाठीशी असल्याने असे छप्पन छत्रपती आले तरी मी घाबरणार नाही,’ असा टोला रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उदयनराजे यांना लगावला.तरडगाव येथे ‘श्रीराम’च्या निवडणूक प्रचारात ते बोलत होते. ‘ज्यांना नीरा-देवघर धरणात पाणी किती आहे, ते माहीत नाही. ज्यांनी पुनर्वसनाच्या बैठका कधी घेतल्या नाहीत, ज्यांनी उरमोडी बघितली आहे की नाही, ज्यांना स्वत:च्या मतदारसंघाचा विकास साधता आला नाही व फलटण तालुक्याच्या विकासाशी ज्यांचा काही संबंध नाही, अशा व्यक्तीकडून तालुक्यातील हस्तक्षेप कधीही मान्य केला जाणार नाही. त्यास कायम आपला विरोध राहील. मला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अडविण्यास निघालेल्यांना मी कधी व कसा अडकवेन हे कळू देखील देणार नाही,’ असा इशारा रामराजेंनी उदयनराजेंनरामराजेंचे चार प्रश्न कारखान्याची ऐंशी कोटींची जमीन खरेदी कराल का ?पाटबंधारेसाठी निधी आणणार का ?एफआरपी प्रमाणे केंद्राकडून उसाला दर आणणार का ?प्रश्न सोडविणार नसाल तर राजीनामा देणार का ?
रामराजेंनी केली मध्यस्थांकरवी याचना!--उदयनराजे भोसले यांचा गौप्यस्फोट-
By admin | Published: April 03, 2015 11:09 PM