उदयनराजेंमुळे पक्ष सोडण्याची रामराजेंची धमकी; खंडाळ्यात येण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 09:50 PM2019-06-14T21:50:11+5:302019-06-14T22:00:46+5:30

डोळे उघडे असतील, वेळ असेल आणि मन स्थिर असेल तर दीड कोटींच्या लँड क्रूझरने खंडाळ्याच्या घाटात यावे.

Ramraje threaten to quit party due to Udayan Raje; will bring out Jawali Trust's scam | उदयनराजेंमुळे पक्ष सोडण्याची रामराजेंची धमकी; खंडाळ्यात येण्याचे आव्हान

उदयनराजेंमुळे पक्ष सोडण्याची रामराजेंची धमकी; खंडाळ्यात येण्याचे आव्हान

Next

सातारा : एक आमदार आणि दोन खासदार एक तिसऱ्या टर्मचे खासदार. ते म्हणाले की मी स्वयंघोषित भगिरथ आहे. माझे म्हणणे आहे की ते स्वयंघोषित छत्रपती आहेत. त्यामुळे दोघांनी एकमेकांच्या चिखल्या-टकल्या काढणे योग्य नाही. तुमचाही कधी राज्याभिषेक झाला नाही. तो घरघुतीच होतो. माझाही झाला तोही वाड्यातच झाला. तेव्हा कोणीही भगिरथ कोणाला स्वयंघोषित म्हणत नाही, असे सांगत रामराजे निंबाळकरांनी खासदार उदयनराजेंना खंडाळ्याच्या घाटात जाण्याचे आव्हान दिले आहे.

 
आपले डोळे उघडे असतील, वेळ असेल आणि मन स्थिर असेल तर खंडाळ्याच्या पलीकडे एक खिंड लागते. तेथे पलीकडे आणि घाटाच्या अलीकडे तुमची दीड कोटीची लँड क्रूझर डावीकडे वळवून कालव्यावरून आंद्रुलपर्यंत प्रवास करावा. मग त्या भागातील गावाला नीरा देवधरच्या कृष्णेचे पाणी मिळू शकत नव्हते त्या गावाला 10-15 बोगदे पाडून पाणी दिले ते पाहावे. ते लोक जर भगिरथ म्हणत असतील आणि जर गेली 15 वर्षे लाल दिव्याच्या गाडीत फिरत असलो तर आपल्याया दुख का व्हावे, तुम्हालाही दोन वर्षे लाल दिवा मिळाला होता, तेव्हा काय केले असा प्रश्न रामराजे यांनी विचारला. 


स्वत:ला छत्रपती म्हणत फिरता आणि कुळातील लोकांची नावे खाली घालून त्यांच्याकडून ना हरकतसाठी पैसे उकळण्याचे धंदे केल्याचा टोला त्यांनी उदयनराजेंना लगावला. फलटनमध्ये येऊन आम्हाला बांडगुळ म्हणता, पण याच बांडगुळांनी तुमच्या आधीची पीढी सांभाळली हे तरी आठवा, असे सांगत जयकुमार गोरे, रणजित नाईकनिंबाळकर आणि उदयनराजे हे यापूर्वी एकत्र होते. साताऱ्याच्या प्रकरणात सर्व आमदारांना उरावर घेतले. एकाला डाव्या काखेत आणि दुसऱ्याला उजव्या काखेत घेऊन फिरणार आहे, असा इशारा रामराजेंनी दिला. 


उदयनराजेविरोधात एक टन पुरावे
पुनर्वसनाच्या जमिनी जर आम्ही घेतल्या त्या सिद्ध करा अन्यथा जावलीच्या ट्रस्टचे घोटाळे उघड करणार आहे. याचे एक टन रेकॉर्ड आहेत. पण छत्रपतींचे घर म्हणून उचित मान द्यावा लागतो म्हणून शांत आहे. आमदार विवेक पंडीत यांनी एकट्याने बाजु घेतली होती. मात्र, त्यांच्याच विरोधात हे गेले, असा इशारा त्यांनी दिला. उदयनराजे खंडाळ्यापुरतेच खासदार असल्याची खिल्लीही त्यांनी उडविली. पाण्याचा वापर त्यांना एकाच गोष्टीतून कळतो, असा टोलाही त्यांनी लगावला. माढ्याच्या खासदाराला पुढील महिन्याभरात पश्चाताप होईल, असेही त्यांनी सांगितले. 

शरद पवारांना स्पष्ट शब्दांत सांगणार
उद्या राष्ट्रवादीची जिल्हा बैठक होणार आहे. त्यामध्ये शरद पवार यांना तुमचा खासदार सांभाळायचा असेल तर कंट्रोलमध्ये ठेवा अन्यथा आम्हाला बाहेर पडायची परवानगी द्यावी, असे स्पष्ट शब्दांत सांगणार असल्याचे रामराजे यांनी सांगितले. 
 

Web Title: Ramraje threaten to quit party due to Udayan Raje; will bring out Jawali Trust's scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.