मार्तंड देव संस्थानकडून वसुली

By Admin | Published: April 3, 2017 01:49 AM2017-04-03T01:49:44+5:302017-04-03T01:49:44+5:30

मार्तंड देव संस्थानची नगराध्यक्षांच्या मध्यस्थीने झालेल्या संयुक्त बैठकीत सुमारे २० लाख रुपयांची थकीत पाणीपट्टीची वसुली झाली

Recovery from Martand Dev Institute | मार्तंड देव संस्थानकडून वसुली

मार्तंड देव संस्थानकडून वसुली

googlenewsNext


जेजुरी : जेजुरी नगरपालिका आणि मार्तंड देव संस्थानची नगराध्यक्षांच्या मध्यस्थीने झालेल्या संयुक्त बैठकीत सुमारे २० लाख रुपयांची थकीत पाणीपट्टीची वसुली झाली आहे. पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे व उपनगराध्यक्ष गणेश निकुडे यांनी देव संस्थानच्या विश्वस्तांचे आभार मानून शहराच्या विकासाबाबत पालिकेबरोबर राहण्याचे आवाहनही केले.
जेजुरी नगरपालिकेची यावर्षीची केवळ ७० टक्केच करवसुली झाली आहे. यातील सर्वांत जास्त थकबाकी मार्तंड देव संस्थानकडे होती. देव संस्थानकडे जेजुरी नगरपालिकेची सन २००६ ते २०१२ या कालावधीतील सुमारे २० लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत राहिली होती. पालिका प्रशासन आणि मार्तंड देव संस्थांनमध्ये सहमती होत नसल्याने थकबाकी तशीच राहिली होती. पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे व उपनगराध्यक्ष गणेश निकुडे यांनी पुढाकार घेऊन पालिका पदाधिकारी व मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्तांची बैठक बोलावली होती. बैठकीला पालिकेच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह मुख्याधिकारी समीर भूमकर, गटनेते सचिन सोनवणे, पाणीपुरवठा समितीच्या सभापती पौर्णिमा राऊत, बांधकाम समिती सभापती अजिंक्य देशमुख, नगरसेवक बाळासाहेब सातभाई, बाळासाहेब दरेकर, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे व पालिका प्रशासकीय कर्मचारी तसेच मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप घोणे, विश्वस्त सुधीर गोडसे, अ‍ॅड. किशोर म्हस्के, अ‍ॅड. दशरथ घोरपडे उपस्थित होते.
बैठकीत जेजुरी पालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या थकीत वीजबिलाबरोबरच देवसंस्थानकडून थकीत असलेल्या पाणीपट्टीबाबत चर्चा झाली. महावितरणकडून वीजबील न भरल्यास वीज पुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पालिकेच्या करांची वसुली झाली तरच महा वितरणचे बिल भरणे शक्य होणार आहे. अशावेळी नागरिकांबरोबरच येथे येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होणार आहे. देव संस्थानने त्यांची पाणीपट्टीची थकबाकी भरून सहकार्य करण्याची विनंती पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. देव संस्थानच्या विश्वस्तांनीही याबाबत सहमती दर्शवून रुपये २० लाख रूपयांचा धनादेश पालिकेच्या नगराध्यक्षांकडे सुपूर्त केला. देवसंस्थान आणि पालिकेने सहमतीपूर्वक जेजुरी शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला.
(वार्ताहर)

Web Title: Recovery from Martand Dev Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.