मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ५१ हजार ४५७ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.०६ टक्के एवढे झाले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीला ब्रेक लावण्यात यश मिळत असतानाच आज रुग्णसंख्येच पुन्हा मोठी वाढ झाली आहे. आज राज्यातील रुग्णसंख्याही ३० हजारांहून अधिक झाली आहे. (Maharashtra reports 34,031 new COVID -19 cases, 51,457 recoveries and 594 deaths in the last 24 hours )
राज्यात गेल्या २४ तासांत ३४ हजार ०३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५४ लाख ६७ हजार ५३७ वर पोहचली आहे. तर राज्यात आत्तापर्यंत ४९ लाख ७८ हजार ९३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.०६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ४ लाख ०१ हजार ६९५ अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णाल आणि घरीच्या घरी उपचार सुरु आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी १८ लाख ७४ हजार ३६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४ लाख ६७ हजार ५३७ (१७.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३० लाख ५९ हजार ०९५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३ हजार ८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घटमुंबईत गेल्या २४ तासात १३५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४,५६५ रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के आहे. सध्या मुंबईत २९,६४३ सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर २६९ दिवसांवर पोहोचला आहे. १२ मे ते १८ मे दरम्यात रुग्णवाढीचा दर हा ०.२५ टक्के इतका होता.