शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
3
"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
4
Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स
5
"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'
6
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
7
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
8
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
9
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
10
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
11
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
12
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
13
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
14
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
15
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
16
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
17
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
18
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
19
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
20
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!

मतदान यंत्रावरून पक्षांचे चिन्ह काढा

By admin | Published: September 24, 2015 2:09 AM

विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवाराचे चिन्ह राखून ठेवणे समानतेला धोका देणारे आहे.

पारनेर (अहमदनगर) : विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवाराचे चिन्ह राखून ठेवणे समानतेला धोका देणारे आहे. पक्ष किंवा समूहाने निवडणूक लढविणे घटनाबाह्य असून राजकीय पक्षांची मतदान यंत्रावरील चिन्हे रद्द करावी, अशी मागणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. एखादा अपक्ष उमेदवार उभा राहिला तर त्याला पंधरा दिवसानंतर चिन्ह दिले जाते. उत्तर प्रदेश सरकारने ग्रामपंचायतीत राजकीय पक्षांचे चिन्ह आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अण्णांनी त्यास विरोध करुन निवडणूक आयोगाकडे दाद मागितल्याने उत्तर प्रदेश सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला. त्याच धर्तीवर देशातील निवडणूक पद्धतीत सुधारणा करण्याच्या मागणीकरिता अण्णांनी बुधवारी राळेगणसिद्धीत पत्रकारांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली. डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेत देशात लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आणताना लोकसभा व इतर निवडणुका लढविताना भारतातील स्वतंत्र नागरिक निवडणूक लढवू शकतो. कोणत्याही समूहाने किंवा पक्षाने एकत्र येऊन निवडणूक लढवावी, असे म्हटलेले नाही. त्यामुळे १९५२ पासून देशातील निवडणुका घटनाबाह्य असून राजकीय पक्षांनी लोकशाहीला धोका दिला आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चाही केली असून राजकीय पक्षांची चिन्हे कोणत्या कायद्याने आरक्षित केली आहे?, अशी विचारणा केल्यावर ते निरुत्तर झाल्याचा दावा अण्णांनी केला. समूहाने निवडणूक लढविल्याने लोकशाहीच्या पवित्र मंदिरात गुंड व भ्रष्ट लोक काही प्रमाणात शिरले. त्याला काही राजकीय पक्षांनी खतपाणी घातल्याने लोकशाहीचे नुकसान केले आहे, असे अण्णांनी म्हटले आहे. महाविद्यालयातही राजकीय पक्ष आपल्या पक्षांचा वापर करून तरूणांमध्ये वाद पसरवित असल्याचा आरोप अण्णांनी केला. समूहाने निवडणूक लढविल्याने : आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेऊन मतदान यंत्रावर फोटो असावा व राजकीय पक्षांचे चिन्ह नसावे, असा विषय मांडला होता. त्यात आयोगाने मतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो लावण्याचे मान्य केले असून त्याची अंमलबजवाणीही सुरू केली आहे. पण राजकीय पक्षांचे चिन्हच काढून टाकावे, या मागणीचा माझा आग्रह कायम असून त्यासाठी देशभरात जनजागृती करणार असल्याचे अण्णांनी सांगितले. विधी आयोगाचा अजब सल्लादेशात अपक्षांना निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी शिफारस विधी आयोगाने केल्याची माहिती मला मिळाली आहे. हे जर खरे असेल तर राजकीय पक्षांची मक्तेदारी वाढवित भारतीय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रकार असल्याचे अण्णांनी म्हटले आहे.