आदीवासी कोट्याबाहेर धनगर समाजाला आरक्षण - मुख्यमंत्री

By admin | Published: August 13, 2014 04:31 PM2014-08-13T16:31:25+5:302014-08-13T17:21:54+5:30

आदीवासी जमातीमध्ये (एसटी ) आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणा-या धनगर समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला आहे.

Reservation for Dhangar community outside tribal quota - Chief Minister | आदीवासी कोट्याबाहेर धनगर समाजाला आरक्षण - मुख्यमंत्री

आदीवासी कोट्याबाहेर धनगर समाजाला आरक्षण - मुख्यमंत्री

Next
>ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. १३ -  आदीवासी जमातीमध्ये (एसटी ) आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणा-या धनगर समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला आहे. धनगर समाजाला आदीवासी कोटा वगळता आरक्षण दिले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. 
मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेवून शासनाच्या अनेक निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. धनगर समाजाच्या आरक्षणाबरोबरच मराठवाडयातील अनेक जिल्हयात पडलेल्या दुष्काळसदृष्य तालुक्यांना दिलासा देण्यात येणार आहे. राज्यातील १२३ तालुके टंचाईग्रस्त जाहिर करण्यात आले असून टंचाईग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. टंचाईग्रस्त तालुक्यातील कृषीपंपाचा वीजबीलाला ३३ टक्के सवलत देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. धनगर समाजाचे आरक्षण हे तिसर-या सुचीमध्ये यावे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, धनगर समाज आरक्षणाची शिफारस राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या कोर्टात गेला आहे. दरम्यान, राज्य सरकारने धनगर समाजासाठी घेतलेला निर्णय आपल्याला मान्य नसल्याची प्रतिक्रीया धनगर समाजाचे नेते आणि राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनी दिली आहे. तसेच लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. 

Web Title: Reservation for Dhangar community outside tribal quota - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.