मुंबई - मराठा आरक्षणावर आज मुंबई उच्च न्यायालयात लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले आहेत. आज ( गुरुवारी ) दुपारी ३ वाजता हा निकाल लागणारा आहे. आजचा दिवस आमच्यासाठी सुवर्ण दिवस असू शकतो, कारण मराठा आरक्षणाचा निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल याचा मला पूर्णपणे विश्वास आहे असे, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले. एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
राज्यात शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधी ३० नोव्हेंबर, २०१८ मध्ये राज्य सरकारने कायदा मंजूर केला होता. या कायद्याला विरोध करणाऱ्या तर काही सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. आज (गुरुवार) या याचिकांवर उच्च न्यायालयनिकाल देणार आहे. यावर बोलताना विनोद पाटील म्हणाले की, आज येणारा निकाल हा फक्त निकाल आणि घटना नसून या निकालावर मराठा समाजाची एक पिढी अवलंबून आहे. आजचा निकाल मराठा समाजाच्या बाजूनेच लागेल याचा मला विश्वास आहे. असे पाटील म्हणाले.
आजचा निकाल ने मराठा समाजातील तरुणांमध्ये शिक्षणाकडे येण्याच्या आकर्षण निर्माण होईल . आमच्या बाजूने जर निकाल आलातर ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धेत भग घेण्याची संधी मिळेल आणि तो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येईल असे पाटील म्हणाले.