मुंबई/पुणे : राज्याला शनिवारी परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आगामी चार दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुंबईत शनिवारी दुपारपर्यंत आकाश स्वच्छ होते. दुपारनंतर ढग जमून गडगडाट होऊन त्यापाठोपाठ मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. उपनगरातही जोरदार पाऊस पडला. पुणे शहरात अर्ध्या तासात तब्बल ११.६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ढगफुटीसारखा झालेल्या पावसाने अनेक ठिकाणांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कोल्हापूर सांगली, सातारा, आणि सोलापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला असून आष्टा (जि. सांगली) येथे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. विदर्भ व मराठवाड्यातही दुपारनंतर सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. सोंगणीला आलेल्या सोयाबीन उडीद पिकाचे यामुळे नुकसान झाले.प्रमुख शहरांत झालेला पाऊसशनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रमुख शहरात पडलेला पाऊस : पुणे ११.Þ६, कोल्हापूर १६, सांगली ११, सोलापूर १४, सातारा ४, पणजी २, औरंगाबाद १३ मिमी पावसाची नोंद झाली होती