रिक्षाचालक -प्रवाशांसाठी मोबाईल अॅप तयार करा
By admin | Published: May 17, 2016 02:57 AM2016-05-17T02:57:37+5:302016-05-17T02:57:37+5:30
शहरातील रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी राज्य शासनाने मोबाईल अॅप विकसित करावा
पुणे : शहरातील रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी राज्य शासनाने मोबाईल अॅप विकसित करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र रिक्षाचालक-मालक कृती समितीच्या बैठकीत संघटनेच्या १४ सभासदांनी सहभाग घेतला.
या बैठकीनंतर संघटनेच्या सदस्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिल्याची माहिती संघटनेचे बाबा सय्यद, आनंद अंकुश, सुभाष कारंडे यांनी दिली. या मागणी संघटनेच्या वतीने राज्य शासनाने मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या परवाना शुल्कात केलेली वाढ तसेच वाढीव दंडाची रक्कमही वाढविण्यात आली होती. हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय परिवहनमंत्री रावते यांनी जाहीर केलेला असला तरी प्रशासनाकडून अद्याप त्याबाबत अध्यादेश काढण्यात आलेला नाही.१५ दिवसांत हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. याशिवाय शहरातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ओला आणि उबेर कंपन्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केलेली आहे.