पुराव्याअभावी बलात्काराच्या आरोपातून सुटका
By admin | Published: May 2, 2015 01:35 AM2015-05-02T01:35:42+5:302015-05-02T01:35:42+5:30
बलात्कारासारख्या गंभीर आरोपातून सत्र न्यायालयाने कफ परेड येथील दास रोनाल्डो या आरोपीची सुटका केली आहे. दोन वर्षांपूर्वी कफ परेड पोलीस
मुंबई : बलात्कारासारख्या गंभीर आरोपातून सत्र न्यायालयाने कफ परेड येथील दास रोनाल्डो या आरोपीची सुटका केली आहे. दोन वर्षांपूर्वी कफ परेड पोलीस ठाण्यात पीडित तरूणीने या संदर्भात गुन्हा नोंदवला होता. दासची आई एका चर्चची केअर टेकर आहे. काही अनाथ मुली त्यांच्या घरात राहतात. त्यांच्यापैकी एका तरुणीने ही तक्रार केली होती.
घरात कोणी नसल्याची संधी सांधत दासने बलात्कार केला. तसेच दासच्या आईने गर्भपात करायला सांगितला, असा पीडित तरूणीचा आरोप होता. सत्र न्यायालयात याचा खटला चालला. अॅड. प्रकाश साळशिंगीकर यांनी दासच्यावतीने युक्तिवाद केला. पीडितीने गर्भपात केला नसून प्रसुतीच्यावेळी बाळ दगावले असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे. महत्त्वाचे म्हणजे दासच्या आईने आपल्याला घरातच ठेवावे, या हेतूनेच पीडितने ही तक्रार केली होती, असा युक्तिवाद अॅड. साळशिंगीकर यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने हे शारीरीक संबंध संमतीनेच झाले असावेत असा निष्कर्ष नोंदवत दासची या आरोपातून सुटका केली.