कारवार येथे दरड कोसळल्याने रेल्वे ठप्प झाल्याची अफवा; कोकण रेल्वेने केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 03:02 PM2019-08-07T15:02:49+5:302019-08-07T15:03:50+5:30

कोकण रेल्वे धीम्या गतीने सुरू - कोकण रेल्वे प्रशासन 

Rumor has it that Konkan Railway has been stalled due to heavy rains at Karwar; Konkan Railway | कारवार येथे दरड कोसळल्याने रेल्वे ठप्प झाल्याची अफवा; कोकण रेल्वेने केलं स्पष्ट

कारवार येथे दरड कोसळल्याने रेल्वे ठप्प झाल्याची अफवा; कोकण रेल्वेने केलं स्पष्ट

googlenewsNext

मुंबई : कारवार येथे दरड कोसळून कोकण रेल्वे ठप्प झाल्याचा मेसेज सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा मेसेज खोटा असून कारवार येथे दरड कोसळली नाही. कोकण रेल्वे धीम्या गतीने सुरू आहे, असे कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले. कोकण रेल्वेला पावसाने झोडपले आहे. त्यामुळे येथील मेल, एक्सप्रेस धीम्या गतीने सुरू आहे. यासह कुडाळ आणि झाराप दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचण्याने येथून मेल, एक्सप्रेस कूर्मगतीने चालविली जात आहे.

गाडी क्रमांक  50101 काम करताना लोको पायलट एस. जी. गावडे आणि सहायक लोको पायलट  सचिन जाधव  यांनी कुडाळ - झाराप दरम्यान ट्रॅकवर पाणी आहे हे पाहून आपली गाडी सावधपणे झाराप स्टेशनवर नेली आणि पाणी आहे याची कल्पना स्टेशन मास्टर यांना दिली. ट्रॅकवरील खडी काही प्रमाणात वाहून गेली आहे असे निदर्शनास आले आहे.

 

Web Title: Rumor has it that Konkan Railway has been stalled due to heavy rains at Karwar; Konkan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे