मुंबई : कारवार येथे दरड कोसळून कोकण रेल्वे ठप्प झाल्याचा मेसेज सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा मेसेज खोटा असून कारवार येथे दरड कोसळली नाही. कोकण रेल्वे धीम्या गतीने सुरू आहे, असे कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले. कोकण रेल्वेला पावसाने झोडपले आहे. त्यामुळे येथील मेल, एक्सप्रेस धीम्या गतीने सुरू आहे. यासह कुडाळ आणि झाराप दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचण्याने येथून मेल, एक्सप्रेस कूर्मगतीने चालविली जात आहे.
गाडी क्रमांक 50101 काम करताना लोको पायलट एस. जी. गावडे आणि सहायक लोको पायलट सचिन जाधव यांनी कुडाळ - झाराप दरम्यान ट्रॅकवर पाणी आहे हे पाहून आपली गाडी सावधपणे झाराप स्टेशनवर नेली आणि पाणी आहे याची कल्पना स्टेशन मास्टर यांना दिली. ट्रॅकवरील खडी काही प्रमाणात वाहून गेली आहे असे निदर्शनास आले आहे.