२,८६० कोटींचा विक्रीकर थकीत, व्यापा-यांकडील वसुली रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 04:38 AM2018-01-06T04:38:31+5:302018-01-06T04:38:42+5:30

राज्यातील हजारो व्यापा-यांकडे २ हजार ८६० कोटी १८ लाख रुपयांचा विक्रीकर थकीत आहे. यातील बहुतांश व्यापाºयांनी आपले उद्योग-व्यवसाय गुंडाळून पोबारा केल्याने ही वसुली वादात सापडली आहे. बेपत्ता व्यापा-यांचे नवे लोकेशन शोधण्यासाठी विक्रीकर विभागाने आता पोलीस, महसूल व नगरविकास खात्याला साकडे घातले आहे.

Sales of 2,860 crores were exhausted, recovery was done by traders | २,८६० कोटींचा विक्रीकर थकीत, व्यापा-यांकडील वसुली रखडली

२,८६० कोटींचा विक्रीकर थकीत, व्यापा-यांकडील वसुली रखडली

Next

- राजेश निस्ताने
यवतमाळ - राज्यातील हजारो व्यापा-यांकडे २ हजार ८६० कोटी १८ लाख रुपयांचा विक्रीकर थकीत आहे. यातील बहुतांश व्यापाºयांनी आपले उद्योग-व्यवसाय गुंडाळून पोबारा केल्याने ही वसुली वादात सापडली आहे. बेपत्ता व्यापा-यांचे नवे लोकेशन शोधण्यासाठी विक्रीकर विभागाने आता पोलीस, महसूल व नगरविकास खात्याला साकडे घातले आहे.
कित्येक व्यापा-यांनी विक्रीकर न भरता, आपले व्यवसाय त्या ठिकाणावरून गुंडाळले. या थकबाकीच्या वसुलीसाठी विक्रीकर विभागाला त्यांचा ठावठिकाणाच मिळेनासा झाला आहे.
अशा व्यापा-यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यांच्याकडील सुरुवातीचा थकबाकीचा प्रत्यक्ष आकडा १२ हजार ३३४ कोटींवर पोहोचला होता, अशीही माहिती आहे. मात्र, मागील प्रलंबित वसुली पुढील वर्षामध्ये परिगणित होत असल्याचे सांगून, हा आकडा या वर्षी २ हजार ८६० कोटी १८ लाख एवढा दाखविण्यात आला आहे.

तलाठी-तहसीलदारांची मदत

ज्या ठिकाणी व्यवसाय सुरू होता, त्या जागेबाबत तलाठी, तहसीलदार, नगरपालिका, महानगरपालिका, दुय्यम निबंधक (खरेदी-विक्री) यांच्या अभिलेख्यातून काही हाती लागते काय, याच्या तपासणीचे आदेश शासनाने जारी केले आहेत. राज्य शासनाच्या विक्रीकर विभागातील महसूल थकबाकीकडे महालेखापालांनी लक्ष वेधले आहे.
वसुलीसाठी अनेक सूचना केल्या असून, राज्यात प्रभावी कार्यतंत्र निर्माण करण्याची शिफारसही केली आहे, तसेच ५ लाखांपेक्षा अधिक रक्कम थकीत असलेल्या प्रकरणात, संबंधित व्यापाºयाचे अद्ययावत बँक खाते व अन्य तपशील प्राप्तिकर खात्यामार्फत मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Web Title: Sales of 2,860 crores were exhausted, recovery was done by traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.