महागड्या ‘ब्रॅण्ड’ऐवजी बनावट दारूची विक्री

By admin | Published: December 28, 2016 03:49 AM2016-12-28T03:49:49+5:302016-12-28T03:49:49+5:30

नववर्षाच्या स्वागतासाठी महानगरातील अनेक हॉटेल्स आणि पब सज्ज झाले आहेत. त्यासाठी तुम्ही जंगी पार्ट्यांचे आयोजन केले असले तरी त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मद्याबाबत

Sales of fake alcohol rather than expensive 'brands' | महागड्या ‘ब्रॅण्ड’ऐवजी बनावट दारूची विक्री

महागड्या ‘ब्रॅण्ड’ऐवजी बनावट दारूची विक्री

Next

- समीर कर्णुक,  मुंबई

नववर्षाच्या स्वागतासाठी महानगरातील अनेक हॉटेल्स आणि पब सज्ज झाले आहेत. त्यासाठी तुम्ही जंगी पार्ट्यांचे आयोजन केले असले तरी त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मद्याबाबत खातरजमा करून घ्या. कारण तुमचा ‘ब्रॅण्ड’ चांगला असला तरी आतील दारू बनावट असण्याची शक्यता आहे. महागड्या ‘ब्रॅण्ड’मध्ये बनावट दारू भरून त्याची विक्री केली जाण्याची शक्यता दस्तुरखुद्द राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वर्तविली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या दोघा जणांकडून विविध ब्रॅण्डच्या रिकाम्या बाटल्या मोठ्या प्रमाणात जप्त केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी अधिकृत दुकानांमधूनच दारू खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
नाताळ आणि नववर्षाला तळीरामांकडून हजारो लीटर दारू रिचवली जाते. आता अवघ्या चार दिवसांवर आलेल्या नववर्षाच्या स्वागतासाठी शहरांत अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महागड्या दारूदेखील असतात. मात्र या महागड्या दारूच्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई उपनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरातील उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या वाळकेश्वर आणि खार परिसरात छापा घालून शहाजी पटेल आणि चमन वाघेला यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अनेक महागड्या ब्रॅण्डच्या रिकाम्या बाटल्या जप्त केल्या आहेत. त्यामध्ये बनावट दारू भरून त्याची विक्री केली जाणार असल्याची कबुली आरोपींनी दिली.

अशी भरली जाते बनावट दारू
शहरातील मोठमोठ्या हॉटेल्समधून ही टोळी महागड्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, बॉक्ससह काही पैशांमध्ये खरेदी करते. तर काही बाटल्या भंगारवाल्यांकडून खरेदी करतात. १० हजार ते १५ हजार रुपये दारूची किंमत असलेल्या या महागड्या ‘ब्रॅण्ड’च्या बाटल्या साफ करून त्यात शंभर ते दीडशे रुपयांची दारू भरली जाते. त्यानंतर याच बॉटलला पॅक करून ती पुन्हा ग्राहकांना विकली जाते. काही वेळा विदेशातून दारू आणल्याचे सांगत ही टोळी कमी किमतीतदेखील या दारूची विक्री करते.

करडी नजर :नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक नावाजलेल्या ब्रॅण्डमधून बनावट दारूची विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच रात्रीच्या गस्तीमध्ये मोठी वाढ केली असल्याची माहिती पूर्व उपनगरातील भरारी पथक निरीक्षक एस.एस. भोसले यांनी दिली.

Web Title: Sales of fake alcohol rather than expensive 'brands'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.