संभाजीराजेंनी स्वतः तिफण ओढली अन् बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा घेतला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 05:17 PM2020-06-13T17:17:43+5:302020-06-13T17:31:03+5:30

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटवर अकाऊंटवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते एका शेतकरी कुटुंबासोबत तिफण ओढताना दिसत आहेत.

Sambhaji Raje help farmer in kolhapur | संभाजीराजेंनी स्वतः तिफण ओढली अन् बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा घेतला अनुभव

संभाजीराजेंनी स्वतः तिफण ओढली अन् बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा घेतला अनुभव

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात मृग नक्षत्राचा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी भात पेरणी व भाताचे तरवे टाकण्यास सुरुवात झाली आहे. 

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यात मृग नक्षत्राचा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी भात पेरणी व भाताचे तरवे टाकण्यास सुरुवात झाली आहे. 

दरम्यान, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटवर अकाऊंटवर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते एका शेतकरी कुटुंबासोबत तिफण ओढताना दिसत आहेत. यावेळी शेतकऱ्याच्या पायाला भेगा का पडतात? स्वतःच्या घामाने धरतीला भिजवून जगाला पोसणाऱ्या बळीराजाला किती कष्ट सोसावे लागतात? याचा अनुभव घेता आला, असे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटवरून सांगितले.

ते म्हणाले, "मी स्वतःच्या शेतातून घरी येत असताना, वाटेत एक संपूर्ण कुटुंब शेतात पेरणी करत असताना दिसले. गाडी पुढे गेली, पण मला ते दृश्य पाहून राहवलं नाही.  परत गाडी वळवली आणि त्यांच्याकडे गेलो.  सुरुवातीला संकोच वाटला की मी कसा जाऊ? त्यांना कसं विचारू? परंतु न कळत मी त्यांच्या रानात ओढला गेलो."

याचबरोबर, तिफणीला ओढताना एका फेरीतच माझा श्वास फुलून गेला, मला लगेच मास्क काढून ठेवावा लागला. कोरोना मुळे संपूर्ण जगाला थांबले. पण बळीराजाला थांबून चालणार नाही, अन तो थांबणारही नाही, असेही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे. याशिवाय, हा अनुभव मला समृद्ध करून गेला. जगाच्या पोशिंद्या शेतकरी राजाचे संपूर्ण जगाने ऋण व्यक्त करत त्यांचा सन्मान केला पाहिजे, असेही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

आणखी बातम्या...

खाणीत माती खचल्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू, ढिगाऱ्याखाली १० जण अडकल्याची भीती 

भारत-चीन सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात, नेपाळशी चांगले संबंध – लष्कर प्रमुख

नवजात बाळाच्या हृदयात 3 ब्लॉक; आदित्य ठाकरेंनी उपचारांसाठी केली 'लाख'मोलाची मदत  

CoronaVirus Treatment : HCQ सोबत अ‍ॅझिथ्रोमायसिनचा वापर घातक; काय होतोय परिणाम? वाचा...

'या' राज्यात पुन्हा लॉकडाऊन; वीकेंडला संपूर्ण राज्य बंद राहणार, सीमाही सील होणार

स्कीन लोशनऐवजी आले 19 हजारांचे Headphones; नंतर सांगितले “नॉन-रिटर्नेबल” 

Web Title: Sambhaji Raje help farmer in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.