रस्त्याचे काम होईपर्यंत टोल बंद ठेवणार का? शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 08:33 PM2023-08-01T20:33:06+5:302023-08-01T20:33:41+5:30
गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघातावरून विविध प्रश्नांना तोंड फुटलं आहे
Dada Bhuse on Tolls: कसारा- ठाण्यात समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी पहाटे मोठी दुर्घटना घडली. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असतांना गर्डर मशिन आणि क्रेन खाली कोसळल्याने 20 मजूर ठार झाले. तर 3 गंभीर जखमी आहेत. क्रेन आणि स्लॅब खाली अनेक जण दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दरम्यान, तातडीने मदतीसाठी NDRF च्या दोन तुकड्या आणि डॉग स्कॉड देखील घटनास्थळी पोहचले. गेल्या काही दिवसांपासून टोल आणि रस्त्यांची अवस्था यावर बऱ्याच काथ्याकूट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विधान केले.
"रात्री 11.30 ते 12 वाजण्याचा सुमारास हा अपघात झाला. पुलाचे काम तयार सुरू असताना हा अपघात झाला आहे. सिंगापूर यंत्रणाच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. याआधी 94 पुलाचे काम याच कंपनीने केले आहे. मात्र दु्दैवाने ही घटना शहापूर परिसरात घडली. आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू या अपघातात झाले आहेत . 3 जण जखमी आहेत अजून कोणी क्रेन च्या खाली अडकले आहेत का याबाबत शोध सुरू आहे. शोध कार्य झाल्यावर ही घटना कशी घडली याबाबत चौकशी केली जाईल. पण रस्त्याचे काम सुरळीत होईपर्यंत टोल बंद करायचे का नाही याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल", असे अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दादा भुसेंनी दिले.
"महामार्गाचे काम सुरळीत सुरू आहे घाई घडबड होत आहे हे आरोप चुकीचे आहेत. 2024 पर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. अतिशय उच्च तंत्रज्ञान वापरून हे काम सुरू आहे. रात्री आणि दिवसात काय काम करायचे आहे ते पाहूनच सुरू आहे," असे ते म्हणाले.
"1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह करण्याचं निर्णय राज्य सरकराने घेतले आहे. त्याच निर्णयानुसार आज नाशिक मध्ये देखील या सप्ताहाचे उद्घाटन झाले. 131 पेक्षा जास्त योजना महसूल विभागाचे आहेत. या योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावे यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
"नाशिक मुंबई महामार्गावर खड्डे पडले आहेत. या दोन दिवसात याबाबत मी बैठक घेत आहे. लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचे प्रयत्न असेल. या महामार्गावर अनेक कट होते, त्यामुळे देखील ट्रॅफिक होत होते. 22 कट आम्ही आता बंद केले आहेत पोलीस याठिकाणी आता लक्ष देत आहेत. येणाऱ्या 8 दिवसात 50 टक्के तरी ट्रॅफिक कमी होईल. रस्त्याचे काम सुरळीत होईपर्यंत टोल बंद करायचे का नाही याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल, कारण हा विषय त्यांचा आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.