काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 02:32 PM2024-11-23T14:32:41+5:302024-11-23T14:34:25+5:30

Sangola Vidhan Sabha Election Result 2024 Live : हा मतदारसंघ पूर्वीपासून शेकापचा बालेकिल्ला होता. गणपतराव देशमुख हे ११ वेळा या मतदारसंघातून आमदार होते.

Sangola vidhan sabha assembly election result 2024 winning candidates one of Shinde's 50 MLAs lost seat ; Defeat of Shahjibapu Patil in Sangola, by Shekap babasaheb Deshmukh | काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव

काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव

Sangola Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live माझ्यासोबत आलेल्या ५० आमदारांपैकी एकजरी पडला तरी राजकारण सोडून निघून जाईन असे एकदा नाही दोनदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले व काय झाडी, काय डोंगार या वक्तव्याने प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

महायुतीच्या झंझावातात शिंदेंना पक्ष घेऊन जाताना साथ देणारा शिलेदार पडला आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातून शहाजीबापू पाटलांचा दारुण पराभव झाला आहे. शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख २५,३८४ मताने विजयी झाले आहेत. 

हा मतदारसंघ पूर्वीपासून शेकापचा बालेकिल्ला होता. गणपतराव देशमुख हे ११ वेळा या मतदारसंघातून आमदार होते. खुद्द शहाजीबापुंनी देशमुखांविरोधात सहावेळा निवडणूक लढविली होती. २०१९ ला देशमुखांनी वय झाल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे शहाजीबापू पाटलांना संधी चालून आली होती. २०१९ ला शहाजीबापूंचा विजय झाला होता. आता बाबासाहेब देशमुखांनी पुन्हा हा मतदारसंघ खेचून आणत मतदारसंघात शेकापचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. 

सांगोला विधानसभा मतदार संघांमध्ये पडलेली मते पुढीलप्रमाणे :

बाबासाहेब देशमुख - १,१६,२८०  

शहाजीबापू पाटील  - ०,९०,८९६ 

दीपकआबा साळुंखे - ०,५१,००० 

शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख २५ हजार ३८४ मतांनी विजयी.

Web Title: Sangola vidhan sabha assembly election result 2024 winning candidates one of Shinde's 50 MLAs lost seat ; Defeat of Shahjibapu Patil in Sangola, by Shekap babasaheb Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.