Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 12:19 PM2024-11-23T12:19:09+5:302024-11-23T12:21:26+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "खरी शिवसेना, जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती, तिचे नेतृत्व करण्यास एकनाथ शिंदे हेच काबील आहेत, असे उत्तर या निकालातून महाराष्ट्रातील जनतेने दिले आहे. तसेच, 'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी संजय राऊतांची स्थिती' असल्याचे, शिवसेना (एकनाथ शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल येत आहे. मतमोजणी सुरू आहे. येत असलेल्या कलांमध्ये महायुतीला घवघवित यश मिळताना दिसत आहे. तर महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ होताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या निकालात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर सरस ठरताना दित आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, "खरी शिवसेना, जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती, तिचे नेतृत्व करण्यास एकनाथ शिंदे हेच काबील आहेत, असे उत्तर या निकालातून महाराष्ट्रातील जनतेने दिले आहे. तसेच, 'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी संजय राऊतांची स्थिती' असल्याचे, शिवसेना (एकनाथ शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.
आलेला निकाल स्वीकार करण्यासारखा नाही, असे संजय राऊतांचे म्हणणे आहे? असा प्रश्न केला असता, शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले, "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी संजय राऊतांची स्थिती' आहे. शरद पवारांचे उंबरे आणि सोनिया गांधी यांच्या दाराबाहेर उभ्या राहणाऱ्या संजय राऊतांच्या तोंडावर महाराष्ट्रातील जनतेने चपराक लगावली आहे."
मुख्यमंत्री पदासंदर्भातत बोलताना म्हस्के म्हणाले, "ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गोली. मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. मला वाटते की, आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत.
याशिवाय, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील जेनतेसाठी जी मेहनत केली आहे, मग शेतकरी असो, लाडकी बहीण असो, ज्येष्ठ नागरीक असो, कामगार असो, सर्वांसाठी ज्या योजना आणल्या आणि दिवस रात्र जे काम केले. त्याचा परिणाम म्हणजे हा निकाल आहे," असेही म्हस्के म्हणाले.