सरकारी बँकांमध्ये गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात आली. यामध्ये ज्यांना संधी मिळाली नाही किंवा ज्यांना बँकेचीनोकरी हवी आहे त्यांच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये (Saraswat Bank BDO Application 2021) बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसरच्या 150 जागा भरायच्या आहेत. या पदांसाठी उद्याचा शेवटचा दिवस आहे. (Recruitment in Saraswat Bank BDO 150 post.)सारस्वत बँकेच्या विविध झोनमध्ये मार्केटिंग, सेल्सचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी 31 मार्च, 2021 ही अखेरची तारीख आहे. saraswatbank.com वर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया 17 मार्च 2021 ला सुरु झाली होती.
सारस्वत बँकेच्या बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर पदांसाठी मान्यताप्राप्त विश्वविद्यालय किंवा अन्य उच्च शिक्षण संस्थांकडून कमीत कमी 50 टक्के गुणांनी कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण अशी अट ठेवण्यात आली आहे. उमेदवारांकडे कोणत्याही बँकेमध्ये किंवा एनबीएफसीमध्ये सेल्स किंवा मार्केटिंग विभागातील कमीतकमी एक वर्षाचा अनुभव असायला हवा. याशिवाय उमेदवाराचे वय 1 फेब्रुवारीला 21 ते 27 वर्षांच्या आतमध्ये असायला हवे.
निवड प्रक्रिया...सारस्वत बँकेमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट पदांसाठी ऑनलाईन परिक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे. ऑनलाईन परिक्षेत सामान्य/ आर्थिक ज्ञान, इंग्रजी आणि कॉम्प्युटर अॅप्टीट्यूड, प्रोफेशनल नॉलेज संबंधी एकूण 190 प्रश्न विचारले जाणार आहेत. या परिक्षेत कमीतकमी 50 टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना मेरिटनुसार नोकरी देण्यात येणार आहे.