सरसंघचालक मोहन भागवत अपघातातून थोडक्यात बचावले
By admin | Published: June 5, 2014 12:22 AM2014-06-05T00:22:24+5:302014-06-05T00:22:24+5:30
विमानतळावर जात असताना सुरक्षा ताफ्यातील एका वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातातून सरसंघचालक मोहन भागवत थोडक्यात बचावले.
Next
>नवी दिल्ली : विमानतळावर जात असताना सुरक्षा ताफ्यातील एका वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातातून सरसंघचालक मोहन भागवत थोडक्यात बचावले.
सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी धौलाकुंआ रेडलाईट पॉईंटवर भागवत यांच्या कारवर त्यांच्याच सुरक्षा ताफ्यात असलेली एक कार येऊन धडकली. या कारला तिच्या मागून येणा:या एका दुस:या कारने धक्का दिला होता.
भागवत विमानतळावर जात होते. तेथून त्यांना गोरखपूरसाठी रवाना व्हायचे होते. अपघातानंतर ते आपल्या खासगी वाहनाने विमानतळावर पोहोचले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक राम माधव यांनी ट¦ीट करून ‘भागवत पूर्णपणो स्वस्थ असून पुढील दौ:यासाठी रवाना झाले आहेत’ असे सांगितले. सुरक्षा वाहनाने भागवत यांच्या वाहनाला दिलेली धडक फार हळू असल्याने अनर्थ टळला. मंगळवारी सकाळी विमानतळावर जात असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे कार अपघातात निधन झाले.