Gokul Milk Price Hike: अमूल पाठोपाठ गोकुळकडूनही दूध दरवाढीची घोषणा; जाणून घ्या नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 06:44 PM2021-07-09T18:44:27+5:302021-07-09T18:45:05+5:30

Gokul Milk Price Hike: अमूल पाठोपाठ आता गोकुळ दूध संघाने दुधाच्या दरात वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.

satej patil declares that gokul milk price hike for relief to farmers | Gokul Milk Price Hike: अमूल पाठोपाठ गोकुळकडूनही दूध दरवाढीची घोषणा; जाणून घ्या नवे दर

Gokul Milk Price Hike: अमूल पाठोपाठ गोकुळकडूनही दूध दरवाढीची घोषणा; जाणून घ्या नवे दर

googlenewsNext

कोल्हापूर: कोरोना संकटाच्या काळात सर्वसामान्यांना  महागाईचा फटका बसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्यात आता दुधाची भर पडली आहे. अमूल पाठोपाठ आता गोकुळ दूध संघाने दुधाच्या दरात वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. (satej patil declares that gokul milk rate hike for relief to farmers)

सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यावेळी हसन मुश्रीफही उपस्थित होते. गोकुळ दूध संघाने दूध खरेदी दरात वाढ केली आहे. म्हशीच्या दुधाला २ रुपये तर गायीच्या दुधाला १ रुपयांची वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच  दूध खरेदी दरवाढ ११ जुलै पासून लागू होणार असून, दूध खरेदी दरवाढीमूळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य भागांत दूध विक्री दरात वाढ करण्यात येत असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली. 

देशभरातील १७ राज्यांमध्ये पेट्रोल ₹ १०० पार; ‘या’ शहरात सर्वाधिक इंधनदर

मुंबईतही गोकुळ दूध होणार महाग

कोल्हापूर जिल्हा वगळता अन्य ठिकाणी दूध विक्री दरात २ रुपायांची वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात जिथे गोकुळच्या दुधाची विक्री केली जाते, तेथे ग्राहकांना दूध खरेदीसाठी अधिकचै पैसे मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे, गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना सध्या म्हशीच्या दुधाला ३९ रुपये तर, गाईच्या दुधासाठी २६ रुपये दर देत असल्याचे सांगितले जात आहे. 

हीच ती वेळ! देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता; हायकोर्टाने केले स्पष्ट

दरम्यान, एक जुलैपासून अमूलचे दूध २ रुपयांनी महागले. देशातील सर्व राज्यांमध्ये नवे दर लागू झाले आहेत. अमूलच्या सर्व उत्पादनांच्या किमतीत वाढ होणार आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी-स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रिम यांच्या किमती लीटरमागे २ रुपयांनी वाढले आहेत. जवळपास दीड वर्षांनी अमूलकडून उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
 

Web Title: satej patil declares that gokul milk price hike for relief to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.