‘शनी’ जवळून देणार दर्शन... घेणार का? २७ ऑगस्टला पृथ्वीच्या जवळ, सूर्याशी प्रतियुती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 06:22 AM2023-08-15T06:22:06+5:302023-08-15T06:23:36+5:30
शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ आणि अगदी सूर्यासमोर राहील.
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : येत्या ३१ ऑगस्ट राेजी खगाेलप्रेमींना ‘सुपर ब्ल्यू मून’चे दर्शन घडणार आहे. पण त्यापूर्वी अंतराळातील आणखी एक सुंदर अशा ‘शनी’ ग्रहाचे दर्शन नागरिकांना करता येईल. २७ ऑगस्टला शनी पृथ्वीच्या जवळ राहील.
ग्रहाभाेवती गाेल फिरणाऱ्या वादळी कड्यांमुळे अतिशय विलाेभनीय असलेल्या शनी ग्रहाला दुर्बिणीने पाहण्याची संधी अवकाश निरीक्षक, खगाेलप्रेमींना मिळणार आहे. शनी ग्रह २७ ऑगस्टला पृथ्वीच्या जवळ आणि अगदी सूर्यासमोर राहील. याला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. त्यामुळे या काळात शनीची सुंदर कडी चांगल्या प्रकारे दिसू शकते. २७ ऑगस्टला सूर्य मावळल्यानंतर लगेच शनी हा पूर्व क्षितिजावर उगवेल व पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल.