पुणे - ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारेंना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक वृत्तानुसार प्रकृती बिघडल्याने अण्णांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, अण्णा हजारे हे नियमित तपाणसीसाठी रुबी रुग्णालयात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अण्णांच्या प्रकृतीबाबत रुबी हॉलचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. अवधुत बोडमवाड यांनी सांगितले की, छाती दुखू लागल्याने अण्णा हजारे यांना रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, अण्णा हजारे यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तसेच अण्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्या प्रकृतीस आराम पडावा, अशी सदिच्छा व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली आहे.