निफ्टीलाही फटका : गुंतवणूकदारांनी केली नफा वसुली; बाह्य कारणांचाही समावेश
मुंबई : सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारी शेअर बाजारात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 52 अंकांनी कोसळला. आयटी, तेल आणि गॅस तसेच एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठय़ा प्रमाणात नफावसुली झाल्यामुळे ही घसरण झाली.
30 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी सकारात्मक होता. तो थोडासा वर उघडला होता. एका टप्प्यावर तो 24,925.90 टक्क्यांर्पयत वर चढला होता. मात्र, नंतर नफावसुलीला प्रारंभ झाला. जोरात विक्री सुरू झाल्याने सेन्सेक्सने कमावलेले अंक निसटले. जोर इतका होता की, एका क्षणी सेन्सेक्स 24,773.93 अंकांर्पयत खाली गेला. सत्रच्या अखेरच्या टप्प्यात मात्र थोडी खरेदी वाढली. त्यामुळे घसरणीला ब्रेक लागला. शेवटी 52.76 अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स 24,805.83 अंकांवर बंद झाला. आजची घसरण आदल्या दिवशीच्या तुलनेत 0.21 टक्के
होती.
गेल्या दोन सत्रंत सेन्सेक्सने 641 अंकांची कमाई केली आहे. त्यामुळे नफा वसुली होणो साहजिकच आहे. गुंतवणूकदारांचा एक गट नफा वसुलीसाठीच शेअर्स खरेदी करीत असतो. भाव वाढताच शेअर्स विकून टाकण्याकडे या वर्गाचा कल असतो.
आजच्या घसरणीला जागतिक पाळीवरील स्थितीही काही प्रमाणात कारणीभूत होती. अमेरिकेच्या रोजगार क्षेत्रच्या आकडेवारीची गुंतवणूकदारांना प्रतीक्षा आहे. युरोपियन सेंट्रल बँकेचे वित्तीय धोरणही असेच प्रतीक्षेत आहे. त्यातच काही विदेशी संस्थांनी शेअर्सची विक्री केली. याचा परिणाम बाजारावर दिसून आला.
काल निफ्टी 7,415.85 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्स 24,898 अंकांवर बंद झाला होता. रिझव्र्ह बँकेने स्टॅटय़ूटरी लिक्विडिटी रेशोचे प्रमाण 50 बेसिक पॉइंटांनी कमी करून 39 हजार कोटी रुपयांची गंगाजळी बँकांसाठी मुक्त केली होती. त्याचा परिणाम म्हणून काल सेन्सेक्स आणि निफ्टीने जोरदार उसळी घेतली होती.
बीएसई क्षेत्रीय निर्देशांकांत आयटी क्षेत्रचा निर्देशांक सर्वाधिक 1.27 टक्क्यांनी कोसळला. तेल आणि गॅस क्षेत्रचा निर्देशांक 1.26 टक्क्यांनी, तंत्रज्ञान क्षेत्रचा निर्देशांक 1.01 टक्क्यांनी तर एफएमसीजी क्षेत्रचा निर्देशांक 0.23 टक्क्यांनी कोसळला. रिअल्टी, भांडवली वस्तू, धातू, टिकाऊ वस्तू, सार्वजनिक कंपन्या, ऊर्जा, वाहन आणि बँकिंग क्षेत्रचे निर्देशांक सकारात्मक झोनमध्ये होते.धातू क्षेत्रने मंदीचे वारे झुगारून जोरदार कामगिरी केली. (प्रतिनिधी)
चीनमधील फॅक्टरी उत्पादनाची आकडेवारी उत्साहवर्धक असल्याचा फायदा या क्षेत्रला मिळाला. टाटा स्टील आणि हिंडाल्को या कंपन्यांचे शेअर्स 3.48 टक्क्यांनी वर चढले.
दरम्यान, विदेशी संस्थांनी काल 575.09 कोटी रुपयांची खरेदी काल बाजारात केली. स्टॉक एक्स्चेंजकडून ही आकडेवारी आज जाहीर करण्यात आली.
रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस, भारती एअरटेल, एमअँडएम, एचडीएफसी या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक कोसळले. एकूण 15 कंपन्यांचे शेअर्स या घसरगुंडीत खाली आले. ओएनजीसीने सर्वाधिक 1.87 टक्क्यांची घसरण नोंदविली.
450 कंपन्यांच्या शेअर्सवर आधारित नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनएक्स निफ्टी 13.60 अंकांनी कोसळून 7,402.25 अंकांवर बंद झाला. ही घसरण 0.18 टक्के आहे. काल निफ्टीने सार्वकालिक विक्रम केला होता. सेन्सेक्सप्रमाणो निफ्टीलाही नफा वसुलीचा फटका बसला.