पुणे येथे अध्यापकांसाठी प्रशिक्षण संस्था उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 04:05 AM2020-01-30T04:05:05+5:302020-01-30T04:10:02+5:30

या प्रशिक्षण संस्थेचे कामकाज चालविण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येईल व मुख्य सचिव हे त्याचे अध्यक्ष असतील.

To set up a training institute for teachers in Pune | पुणे येथे अध्यापकांसाठी प्रशिक्षण संस्था उभारणार

पुणे येथे अध्यापकांसाठी प्रशिक्षण संस्था उभारणार

Next

मुंबई : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीतील बदल लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अधिनस्त अध्यापकांच्या व प्राचार्यांच्या प्रशिक्षणासाठी कंपनी कायद्यान्वये अध्यापक विकास संस्था स्थापन करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाने या संबंधीच्या प्रस्तावास मंजुरी दिली.
या संस्थेत राज्य शासनाचा सहभाग ४० टक्के, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा हिस्सा पाच टक्के, राज्यातील सर्व विद्यापीठांचा हिस्सा ४० टक्के, शैक्षणिक संस्था व उद्योग यांचा हिस्सा पाचटक्के तसेच स्वयंसेवी संस्था व व्यवसाय संस्था यांचा हिस्सा दहाटक्के एवढा राहील. विद्यापीठे तसेच महाविद्यालये, संस्था यांच्याकडून सदस्यत्व शुल्क घेण्यात येणार असून कापोर्रेट व बिझनेस हाऊस यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा कॉर्पस फंड तयार करण्यात येईल. या प्रशिक्षण संस्थेचे कामकाज चालविण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येईल व मुख्य सचिव हे त्याचे अध्यक्ष असतील.

संस्थेची उद्दिष्ट्ये...
- उच्च शिक्षण देणाºया संस्थांमधील शिक्षकांना उद्योग/व्यवसाय व त्यांच्या संबंधित क्षेत्राचे अद्ययावत ज्ञान, शैक्षणिक पद्धती/तंत्रज्ञान यांनी समृद्ध करणे.
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये झालेल्या बदलांच्या आधारे प्रशिक्षणाची परिणामकारकता तपासून प्रशिक्षण पद्धतीमध्ये गरजेनुरुप बदल करणे.
- उद्योग क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या/होणाºया रोजगार संधीच्या आधारे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विकसित करून तसे बदल अभ्यासक्रमामध्ये करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन करणे.
- शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रभावी शिकणे-शिकविण्याची पध्दती स्थापित करणे व शैक्षणिक क्षेत्रामध्ये संशोधनास प्रोत्साहित करणे.

Web Title: To set up a training institute for teachers in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक