शरद पवार, उद्धव ठाकरेंची बैठक संपली; कंगनाबाबत झाला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 09:50 PM2020-09-09T21:50:59+5:302020-09-09T21:51:31+5:30
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. सुमारे दोन तास चर्चा सुरु होती. आज वाढलेला कंगनावरील वाद आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मराठा आरक्षणावरील निर्णय यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते.
मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या दोन्ही हाय टेन्शनच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. यामध्ये कंगना राणौतबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. सुमारे दोन तास चर्चा सुरु होती. आज वाढलेला कंगनावरील वाद आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मराठा आरक्षणावरील निर्णय यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते. याआधी मुंबई महापालिका आयुक्त उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले होते.
कंगना राणौतने काही वेळापूर्वी सलग ट्विट करून मुंबई महापालिका, उद्धव ठाकरे आणि करण जोहर गँगवर टीकेचा मारा केला आहे. यामध्ये तिने ठाकरेंना धमकी दिली आहे.https://t.co/apRzDtQTbT@OfficeofUT#KanganaRanaut@KanganaTeam@ShivSena@karanjohar
— Lokmat (@MiLOKMAT) September 9, 2020
कंगनाच्या वादावरही चर्चा झाली. या बैठकीत महापालिकेने ही कारवाई केली असून राज्य सरकारचा यामध्ये हात नाही आणि हा राज्य सरकारचाही विषय नसल्याचे शरद पवारांना पटवून देण्यात आले. यामुळे या प्रकरणाला जास्त महत्व दिले जाऊ नये असा निर्णय घेण्यात आला.
कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर शरद पवार यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई करत तिला बोलण्यासाठी अनावश्यक संधी दिली आहे. मुंबईमध्ये कित्येक अनधिकृत बांधकामे आहेत. आता अधिकाऱ्यांनी हा निर्णय का घेतला हे पहावे लागेल, असे पवारांनी म्हटले होते. तसेच प्रत्येकाला माहिती आहे की, मुंबई पोलीस सुरक्षेसाठी काम करते. यामुळे कंगना सारख्या लोकांना प्रसिद्धी देता नये, अशा शब्दांत पवार यांनी शिवसेनेचे कान टोचले आहेत.
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. https://t.co/ygTqvWvUKi#marathareservation#narayanRane@CMOMaharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) September 9, 2020
वेळ चुकली का?
या प्रकरणावारील माध्यमे देत असलेल्या प्रसिद्धीवरही मला आक्षेप आहे. माध्यमे ही गोष्ट मोठी करत आहेत. आपल्याला अशा गोष्टी टाळायला हव्यात, असेही पवारांनी एएनआयशी बोलताना सांगितले. तसेच बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी जी कारवाईची वेळ निवडली आहे ती देखील लोकांमध्ये चुकीचा संदेश देते, असे पवार म्हणाले होते.
कंगना येण्याआधीच कारवाई
कंगना आज मुंबईत पोहोचण्याआधीच महापालिकेने तिच्या ऑफिसवर हातोडा मारायला सुरुवात केली होती. मुंबईची पीओकेशी तुलना करणे कंगना राणौतला भोवले. आज मुंबई महानगरपालिकेने कंगनाला जोरदार दणका देत, तिच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत कारवाई केली. मात्र, यावर कंगनाने पुन्हा मुंबई पीओके असल्याचे म्हणत माझे कार्यालय राम मंदिर आहे का ज्यावर बाबराने हल्ला केला, अशी टीका केली आहे.
'शिवाजी महाराजांनी महिलांचं संरक्षण शिकवलं, 'हे' लांडग्यासारखं कंगनाच्या मागे लागलेत' https://t.co/8Z14oWuog2
— Lokmat (@MiLOKMAT) September 9, 2020
पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचे फोटो कंगनाने ट्विट केले असून बाबरची सेना, पाकिस्तान, पाकिस्तानव्याप्त काश्मीर असे उल्लेख करण्यात आले आहेत. ही लोकशाहीची हत्या असल्याचे तिने म्हटले आहे.पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने स्थगिती देण्याआधीच कंगनाचे ऑफिस तोडण्यात आले होते.
जग हादरले! युद्धखोर चीनने मिसाईल डागली; हिमालयाच्या नजिकचे लोकेशन
कंगनाला विनाकारण बोलायची संधी दिली, प्रसिद्धी दिली; शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले
Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार
भारतीयांसाठी उद्या मोठा दिवस; शक्तीशाली योद्धा देशसेवेसाठी झेपावणार