भिवंडीच्या शारदा म्हात्रे यांचा लोकमत वुमन अचिव्हर्स अवार्ड पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 06:11 PM2021-09-03T18:11:14+5:302021-09-03T18:12:30+5:30

भिवंडीच्या समाजसेविका तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शारदा सुरेश म्हात्रे यांच्या सामाजिक कार्याची दखल प्रसिद्ध दैनिक लोकमतने घेतली.

sharda mhatre of bhiwandi honored with lokmat woman achievers award | भिवंडीच्या शारदा म्हात्रे यांचा लोकमत वुमन अचिव्हर्स अवार्ड पुरस्काराने सन्मान

भिवंडीच्या शारदा म्हात्रे यांचा लोकमत वुमन अचिव्हर्स अवार्ड पुरस्काराने सन्मान

googlenewsNext

नितिन पंडीत

भिवंडी:भिवंडीच्या समाजसेविका तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शारदा सुरेश म्हात्रे यांच्या सामाजिक कार्याची दखल प्रसिद्ध दैनिक लोकमतने घेतली असून शारदा म्हात्रे यांचा लोकमत वुमन अचिव्हर्स अवॉर्डने शुक्रवारी सन्मान करण्यात आला. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार मंदा म्हात्रे , प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अभिनेत्री तेजश्री प्रधान , अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते वाशी येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी शारदा म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला. 

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात समाजसेवेच्या कार्यात मोठ्या शारदा सुरेश म्हात्रे यांचे नाव अदबीने घेतले जाते. पती सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या समाजसेवेच्या कार्यात शारदा म्हात्रे यांचा मोलाचा वाटा आहे. भिवंडी तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील त्यांचे समाजसेवेचे कार्य आजही अविरत सुरूच आहे. समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद जोपासत शारदा म्हात्रे यांनी समाजसेवेचा वसा आजही जोपासला आहे. पती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या समाजसेवेच्या कार्यातूनच प्रेरित होऊनच त्यांनी आपल्या समाजसेवेच्या कार्याला सुरुवात केली आहे. 

सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सर्व स्थरातील स्त्री पुरुषांना मदत करून त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शारदा म्हात्रे यांचा प्रयत्न असून कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती हि कशीही असो मात्र आपण मोठ्या धैर्याने व न डगमगता आव्हानांना सामोरे जाऊन आपली आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती कशी सुधारेल यासाठी कुणावरही अवलंबून न राहता स्वतः प्रामाणिक प्रयत्न करावे, तसेच समाजसेवा, राजकारण अथवा इतर कोणतेही व्यवसाय करतांना तरुणांनी आपल्या परिवाराबरोबरच आपल्या आई वडिलांचा मान सन्मान राखून त्यांची सेवा करावी. आई वडिलांची सेवा व आशीर्वादाने आपली प्रगती निश्चितच साध्य होईल असा मोलाचा संदेश त्या तरुणांना व आपल्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना नेहमीच देत असतात. शारदा सुरेश म्हात्रे यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेत आज त्यांचा लोकमत परिवाराच्या वतीने वुमन अचिव्हर्स अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. 
 

Web Title: sharda mhatre of bhiwandi honored with lokmat woman achievers award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.