मुंबई : शिर्डी विमानतळासंबंधी आवश्यक ती सर्व कामे येत्या आॅक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून डिसेंबरमध्ये विमान वाहतूक सुरू होणार आहे.या विमानतळाच्या प्रगतीची आढावा बैठक आज वर्षा निवासस्थानी झाली, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या विमानतळाला जोडणा-या दोन्ही रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करावीत व त्याचा खर्च महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने द्यावा.तसेच शिर्डी संस्थान ते विमानतळ हा रस्ता काँक्रि टचा व मोठा करण्यात यावा. विमानतळ सुरक्षेसाठी ३० पोलीस कर्मचारी अहमदनगर येथून मागविण्यात यावेत व त्यांचे प्रशिक्षण बी. सी. ए. एस. मुंबई करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विमानतळाजवळ स्वतंत्र पोलीस चौकीची व्यवस्था करावी वपोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थानते विमानतळ प्रवासासाठी शिर्डी संस्थानने बस उपलब्ध करून द्यावी. तसेच संस्थानकडून विमानतळावर तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर भाविकांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्यामलाल गोयल, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील, पोलीस महासंचालक सतीश माथूर,नाशिकचे विभागीय आयुक्तएकनाथ डवले, अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे, तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)विमानतळाच्या दोन्ही रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण करणार.रस्त्यांचा खर्च महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी देणार.विमानतळाच्या सुरक्षेसाठी ३० पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार.विमानतळावर भाविकांसाठी शिर्डी संस्थांनकडून भाविकांसाठी सुविधा कक्ष.
शिर्डी विमानतळाचा डिसेंबरमध्ये टेक आॅफ
By admin | Published: August 27, 2016 4:54 AM