शिर्डी आणि गुजरातदरम्यान हवाईसेवा सुरु करण्यात येणार आहे. येत्या 15 फेब्रवारीपासून व्हेच्युरा एअरलाईन्स ही कंपनी सुरवातीला 9 सीटर चार्टर विमानाद्वारे दररोज ही सेवा देणार आहे
आज सुरतहून शिर्डीसाठी चार्टर विमानाने चाचणी घेण्यात आली आहे. दररोज हे विमान सकाळी 10 वाजता शिर्डीला येवून पुन्हा 12 वाजता परतणार आहे. या नंतर 19 आसनी सेवा सुरु करण्याचा मानस कंपनीने व्यक्त केलाय. 3000 ते 5000रुपये प्रती व्यक्ती असं भाडं या विमानाचं असणार आहे.
1 आँक्टोबरला शिर्डी विमानतळाचं उदघाटन झाल्यानंतर सुरूवातीला मुंबई आणि हैद्राबाद येथून एअर इंडीयाने विमानसेवा सुरु केली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता विमानसेवा देणा-या इतर कंपन्यांनीही पुढाकार घ्यावयास सुरूवात केली आहे.