Shiv Sena Dussehra Rally: दसरा मेळाव्याला रामदास कदमांना No Entry?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 11:07 AM2021-10-12T11:07:33+5:302021-10-12T11:09:34+5:30

Shivsena Internal Disputes: माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे जुने विरुद्ध नवीन शिवसेना असा वाद पुन्हा रंगला

Shiv Sena: No entry to Ramdas Kadam for Dussehra rally ?; Chief Minister Uddhav Thackeray angry | Shiv Sena Dussehra Rally: दसरा मेळाव्याला रामदास कदमांना No Entry?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त

Shiv Sena Dussehra Rally: दसरा मेळाव्याला रामदास कदमांना No Entry?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतप्त

Next
ठळक मुद्देरामदास कदम यांच्यावर पक्षांतंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा होती कथित ऑडिओ क्लिप बाहेर येणे योग्य नसल्याची भावना काही शिवसेनेच्या नेत्यांची आहेदसरा महामेळाव्याला रामदास कदम यांना इंट्री नसेल असही काही शिवसेना नेत्यांचे म्हणणे

मुंबई : शिवसैनिकांसाठी विचाराचं सोनं लुटण्याचा दिवस म्हणजे दसरा मेळावा. पण सलग दुसऱ्या वर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार नाही. पण शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा निश्चित झालीय. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावादेखील हॉलमध्येच होणार आहे. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये ५० टक्के उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे. मेळाव्याला मुंबईतले काही नगरसेवक, आमदार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते, मंत्री, उपनेते तसंच महापौर उपस्थित राहणार आहेत. सामान्य शिवसैनिकांना या दसऱ्या मेळाव्याला उपस्थित राहता येणार नाही. त्यात शिवसेना वरिष्ठ नेते रामदास कदम(Ramdas Kadam) दसरा मेळाव्यात उपस्थित राहणार का नाही  याबद्दल अनेक चर्चा आहेत.

का असेल रामदास कदम यांना नो इंट्री ?

माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे जुने विरुद्ध नवीन शिवसेना असा वाद पुन्हा रंगला असून या वादावर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या सर्व प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच संतापले असून, रामदास भाईंवर पक्षांतंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा होती . त्या कथित ऑडिओ क्लिपची शहानिशा करून रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजत होते. मात्र यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. त्यात आता दसरा मेळावा आहे. यावेळी रामदास कदम यांना बोलावलं नसेल अशी देखील चर्चा सुरू आहे.

कदम यांच्यावर कारवाईने पुढे जरब बसेल

रामदास कदम हे शिवसेचे ज्येष्ठ नेते असून, माजी मंत्री देखील राहिले आहेत. त्यांची अशा प्रकारे कथित ऑडिओ क्लिप बाहेर येणे योग्य नसल्याची भावना काही शिवसेनेच्या नेत्यांची आहे. त्यामुळे जर आता रामदास कदम यांच्यावर कारवाई केली तर पक्षात यापुढे असे कृत्य करणाऱ्यांवर जरब बसेल असे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. याचमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रामदास कदम यांच्यावर कारवाई करण्याची दाट शक्यता आहे. रामदास कदमांच्या कथित ॲाडिओ क्लिपमुळे पक्ष बदनाम होत असल्याची भावना देखील शिवसेनेच्या काही नेत्यांची आहे. त्यामुळे या दसरा महामेळाव्याला रामदास कदम यांना इंट्री नसेल असही काही शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.

शिवसैनिक व नेत्यांची ही मागणी

नुकतीच रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आली होती. त्याआधी कोकणातील अनंत गीते यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत महाविकास आघाडीत दुफळी निर्माण केली होती. याचमुळे या दोन्ही नेत्यांवर सध्या शिवसेनेत नाराजी आहे. बाळासाहेबांच्या काळातले हे शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अडचण निर्माण करत आहेत? एवढी मंत्री पदे मिळूनही माजी मंत्री पक्षाला बदनाम का करत आहेत? असा सवाल आता काही शिवसैनिक विचारू लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील पदाधिकारी व आताच्या शिवसेना नेत्यांची या बदनाम करणाऱ्या नेत्यांना मेळाव्याला बोलावू नका अशी भूमिका आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याला रामदास कदम व अनंत गीते यांना यांना इंट्री मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Shiv Sena: No entry to Ramdas Kadam for Dussehra rally ?; Chief Minister Uddhav Thackeray angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.