''महाआघाडी सरकार, हप्ता चालू काम बंद'' किरिट सोमय्यांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 04:22 PM2019-12-21T16:22:17+5:302019-12-21T16:23:08+5:30
किरिट सोमय्या In Action, अजब आहे उद्धव तुझे सरकार
आधीच्या सरकारच्या विकास कामांना स्थगिती देण्याचा सपाटा महाविकास आघाडीच्या सरकारनं लावला असल्याचा आरोप भाजपाकडून वारंवार केला जात आहे. त्यात भाजपाचे वरिष्ठ नेते किरिट सोमय्या यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. महाआघाडीचं सरकार, हप्ता चालू काम बंद, असं असल्याची टीका सोमय्या यांनी केली.
ते म्हणाले की,''अजब आहे उद्धव तुझे सरकार. शिवसेना महाआघाडीनं आता नवीन घोषणा दिली आहे. काम बंद हप्ता चालू.. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, पनवेल, नवी मुंबई, मिरा भाईंदर येथील सर्व ठिकाणाची काम बंद आहेत. सगळ्या ठिकाणच्या कंत्राटदारांना निरोप जात आहेत. येऊन भेटा म्हणून...''
Shivsena MahaAghadi Govt "Hapta Chalu Kam Bandh", Metro work in Mumbai, Thane, Navi Mumbai, Panvel, Mira Bhayandar, .. STOPPED/Standstill.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 21, 2019
शिवसेना महाआघाडी सरकार "हप्ता चालू काम बंद", मुंबई, ठाणे, नवी मुंबई,पनवेल, मिरा भाईंदर...मेट्रो चे काम बंद/मंद @bjpmaha@Dev_Fadnavispic.twitter.com/VrJsCkGanI
मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी कोलाबा सिप्ज़ मेट्रोच्या कामाचे कौतुक केले आणि २०२०/२०२१ मेट्रो सुरू होण्याची अपेक्षा केली. शिवसेना आघाडी सरकारने कार शेड चा कामाला दिलेली स्थगिती व अन्य अडथळे मुळे मुंबई ठाणे मीरा भाईंदरच्या विविध ठिकाणी मेट्रोचे काम बंद झालेत, हळू/स्थिर झाले आहेत
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 15, 2019
I again urge Shivsena Aghadi Govt to withdraw stay & restart Aarey Metro Car Shed work, avoid delay & Cost Inflation Mumbaikars Needs Metro
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 15, 2019
शिवसेना आघाडी सरकारला पुन्हा विनंती, आरे मेट्रो कार शेड ची स्थगिती मागे घ्या, विलंब आणि खर्चात होणारी वाढ थांबवा, मुंबईकर ना मेट्रो हवी आहे