शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

"अति केलं का माती होते, तुमची नाटकं फक्त प्रसिद्धीसाठी"; शिवसेना नेत्यांनी नवनीत राणांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 1:48 PM

Shivsena Manisha Kayande And Navneet Rana : नवनीत राणा यांच्या कार्यालयानेच हे फोटो शेअर केल्यामुळे त्या ट्रोल झाल्यात. याच दरम्यान शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

मुंबई - अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना जामीन मिळाल्यापासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. छाती, मान आणि शरीराच्या अन्य भागात वेदना तसेच स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत असल्याने शनिवारी त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. तथापि, एमआरआय स्कॅन करतेवेळीचे त्यांचे फोटो समोर आल्यामुळे मात्र त्यांना सोशल मीडियावर प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. नवनीत राणा यांच्या कार्यालयानेच हे फोटो शेअर केल्यामुळे त्या ट्रोल झाल्यात. याच दरम्यान शिवसेना नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"तुमची नाटकं फक्त प्रसिद्धीसाठी चालू आहे हे महाराष्ट्र चांगल्याप्रकारे ओळखतो" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Shivsena Manisha Kayande) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "अति केले का माती होते. तुम्ही जर एमआरआय मशीनपर्यंत कॅमेरा घेऊन जात असाल आणि चेहरा कॅमेरात यावा यासाठी धडपड करत असाल तर तुमची नाटकं फक्त प्रसिद्धीसाठी चालू आहे हे महाराष्ट्र चांगल्याप्रकारे ओळखतो" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

एमआरआय स्कॅनिंग रुममध्ये रुग्णाशिवाय अन्य कोणाला परवानगी नाही, महत्त्वाचे म्हणजे कॅमेरा, मोबाइल अशा इलेक्ट्रॉनिक उपरकरणांनाही मनाई असते. अशात, वृत्तसंस्था एएनआयने राणा यांचे एमआरआय करतेवेळीचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले. तसेच हे फोटो खासदाराच्या कार्यालयाकडून शेअर केल्याचेही वृत्तसंस्थेने स्पष्ट केले. यावरून नेटकऱ्यांनी राणा यांना धारेवर धरले. तसेच लीलावती हॉस्पिटलही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.

नर्सच्या जागी कॅमेरामन बसवलाय का?

‘एमआरआय कक्षात मोबाइल किंवा कॅमेरा कसा पोहोचतो?, हॉस्पिटलमध्ये नर्सच्या जागी कॅमेरामन बसवलाय वाटतं, हे सुरक्षा मानकांचे उल्लंघन नाही का? लीलावती हॉस्पिटल लॅबच्या आतमध्येही फोटो काढण्यास परवानगी देते का?’ अशा प्रश्नांची सरबत्तीच नेटकऱ्यांकडून होत आहे. #ड्रामाअलर्ट, #नौटंकी,  #नौटंकीबाज, #बंटीबबली असे हॅशटॅग्स वापरत नेटकरी, ‘तुम्ही जर एमआरआय मशीनपर्यंत कॅमेरा घेऊन जात असाल आणि चेहरा कॅमेऱ्यात यावा यासाठी धडपड करीत असाल तर तुमची नाटकं फक्त प्रसिद्धीसाठी चालू आहे, असे अनेक ट्विट आणि पोस्टस करीत राणा यांच्यावर टीकेचा भडिमार करीत आहेत.  

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाShiv Senaशिवसेना