शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

सत्तेसाठी शिवसेनेची नौटंकी

By admin | Published: October 27, 2016 1:15 AM

एकीकडे सत्तेत राहून सगळे फायदे लाटायचे आणि पुन्हा त्याच सत्तेच्या विरोधात बोलायचे ही शिवसेनेची नौटंकी आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

मुंबई : एकीकडे सत्तेत राहून सगळे फायदे लाटायचे आणि पुन्हा त्याच सत्तेच्या विरोधात बोलायचे ही शिवसेनेची नौटंकी आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्याचेही ते म्हणाले.राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आज स्थानिक निवडणुकांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. या वेळी आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांवर सोपविण्यात आले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास या वेळी तटकरे यांनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी) राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी स्मिता पाटील माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी ईश्वर बाळबुधे यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शेखर गोरे यांच्यासह भाजपा, काँग्रेस, शिवसेना, मनसे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.भास्कर जाधव पक्ष सोडणार नाहीत- माजी मंत्री भास्कर जाधव हे आमच्या पक्षातील महत्त्वाचे नेते असून ते पक्ष सोडून जाणार नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी दिले.- पक्ष संघटनेवर नाराज असलेले जाधव राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. यावर तटकरे म्हणाले, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जातात व त्यासाठीच एखाद्या नेत्याच्या नाराजीच्या बातम्या पसरवल्या जातात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकजूट असून नेत्यांच्या नाराजीच्या बातम्या या निराधार असल्याचे तटकरे म्हणाले.