३ कोटी डॉलरच्या बँक घोटाळ्यात अनिवासी भारतीयासह सहा आरोपी

By admin | Published: May 7, 2014 11:43 PM2014-05-07T23:43:19+5:302014-05-07T23:43:19+5:30

तीन कोटी डॉलरच्या बँक घोटाळा प्रकरणात एका भारतीय वंशाच्या नागरिकासह सहा जणांना आरोपी करण्यात आले आहे.

Six accused with NRIs in bank scam | ३ कोटी डॉलरच्या बँक घोटाळ्यात अनिवासी भारतीयासह सहा आरोपी

३ कोटी डॉलरच्या बँक घोटाळ्यात अनिवासी भारतीयासह सहा आरोपी

Next

न्यूयॉर्क : तीन कोटी डॉलरच्या बँक घोटाळा प्रकरणात एका भारतीय वंशाच्या नागरिकासह सहा जणांना आरोपी करण्यात आले आहे. दोष सिद्ध झाल्यास या सर्वांना ३0 वर्षांच्या तुरुंगाची शिक्षा दिली जाऊ शकते. न्यूयॉर्कमधील ४६ वर्षीय मंजितबाबा यांच्यासमवेत दुसर्‍या आरोपींनी नास्साऊ आणि सुफोल्क काऊं टीमध्ये विक्रेत्यांकडून बाजार दरानुसार घर खरेदीचा करार केला होता. त्यानंतर या आरोपींनी गोदाम सावकारांकडे कर्जासाठी बोगस अर्ज दिले. त्यात त्यांनी घरांची किंमत खर्‍या किमतीपेक्षा दुप्पट दाखविली. कर्ज मंजूर करण्यासाठी या आरोपींनी आपल्या वैयक्तिक संपत्तीत वाढ केली आणि महत्त्वपूर्ण देणेदारी लपवून ठेवली. युक्तिवादानुसार मुख्य प्रतिवादी आरोन वाईडर यांनी २00३ ते २00८ या दरम्यान न्यूयॉर्ककडून परवानाप्राप्त बँक एचटीएफ चालवली होती. त्याने बँकेमार्फत उधारीवर गृहकर्ज दिले. एचटीएफसीकडे हे कर्ज देण्यासाठी मालमत्ता नव्हती. मात्र यासाठी ते इतर बँका आणि वित्तीय संस्थांवर (ज्या सर्वसाधारणपणे वखार कर्जदात्याच्या नावाने ओळखल्या जातात) अवलंबून होते. घर खरेदी करणारे लोक कर्ज फेडण्यासाठी सक्षम आहेत आणि घरांची बाजार किमतीच्या अनुरूप आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी वखार कर्जदात्याने वाइडर आणि एचटीएफसीवर विश्वास ठेवला. दुसरीकडे वाइडर आणि सहआरोपींनी कथितरीत्या घरांच्या किमती कृत्रिमरीत्या वाढविल्या. कर्जदात्या वखारीकडून कर्ज घेण्यासाठी ते खोटे बोलले. हे कर्ज घरांच्या वास्तविक किमतीपेक्षा ८0 टक्के अधिक होते. दोषी आढळल्यास या सर्वांना ३0 वर्षांच्या कैदेची शिक्षा दिली जाऊ शकते आणि त्यांच्या १९ निवासी मालमत्ता जप्त केल्या जाऊ शकतात. नाही तर त्यांच्याकडून ३ कोटी अमेरिकी डॉलरएवढी रक्कम दंडाच्या स्वरूपात वसूल केली जाऊ शकते. (वृत्तसंस्था)

Web Title: Six accused with NRIs in bank scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.