"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 06:45 PM2024-11-04T18:45:45+5:302024-11-04T18:46:50+5:30

"महायुती मजबूत आहे. आमच्या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रीय आहे. आमचे सरकार आले, तर आता दीड हजार रुपये आहेत. त्यात वाढ कण्यात येईल आणि ही योजना अजिबात बंद होणार नाही."

so I am also ready to become Chief Minister Ramdas Athavale said Mann ki Baat | "...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!

"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!

मुख्यमंत्री महायुतीचाच होणार. मात्र तो भाजपचा होणार की आणखी कुठला होणार, हे मला माहीत नाही. पण जर त्यांच्यात काही वाद होत असेल तर, मीसुद्धा तयार आहे (मुख्यमत्री पदासाठी), असे रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटले आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी, विधानसभेत महायुतीची सत्ता येणार आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असे राज ठकारे यांनी म्हटले आहे, आपले काय मत आहे? असा प्रश्न केला असता, रामदास आठवले म्हणाले, "आम्ही सर्वजण येकत्रित बसून ठरवू. आमचाच मुख्यमंत्री होणार, असे भाजपने काही सांगितलेले नाही. मात्र निवडणुकीनंतर जो काही निर्णय आहे, तो आमचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आणि आम्ही महाराष्ट्रातील लोक एकत्र बसून, एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजित दादा पवार आहेत, मी आहे, आम्ही सर्वजण एकत्र बसूना, आमच्यात कलीही अडचण येणार नाही, दुरावा येणार नाही, या दृष्टीकोणातून मंत्रीमंडळ होईल."

"मुख्यमंत्री कोण असेल, हे आम्ही काही आता सांगू शकत नाही. मात्र मुख्यमत्री महायुतीचाच होणार. यामुळे राज ठाकरे यांच्या मताशी मी सहमत आहे की, मुख्यमंत्री महायुतीचाच होणार. पण तो भाजपचा होणार की आणखी कुठला होणार हे मला माहीत नाही. पण जर त्यांच्यात काही वाद होत असेल तर, मीसुद्धा तयार आहे (मुख्यमत्री पदासाठी)", असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

"लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, आमचे सरकार आले तर पैशांत वाढ कण्यात येईल" -
याशिवाय, "महायुती मजबूत आहे. आमच्या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रीय आहे. आमचे सरकार आले, तर आता दीड हजार रुपये आहेत. त्यात वाढ कण्यात येईल आणि ही योजना अजिबात बंद होणार नाही आणि आम्ही ज्या-ज्या घोषणा केल्या आहेत, त्यांची अंमल बजावणी सरकार आल्यानंतर होईल, अशी खात्री आम्ही देतो. तसेच सर्व दलित आणि बोद्ध मतदारांनी यावेळेला महायुतीच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे रहायचे आहे, असे मी आमच्या सर्व मतदारांना आवाहन करतो, असेही आठवले यावेळी म्हणाले. 

Web Title: so I am also ready to become Chief Minister Ramdas Athavale said Mann ki Baat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.