शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
2
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
3
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
4
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
5
India vs Australia PM XI पिंक बॉल प्रॅक्टिस टेस्ट मॅचला 'वनडे' ट्विस्ट!
6
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
7
केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज
8
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
9
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
10
"हिंदी सिनेमा करु शकणार नाही असा विचार केला होता", अल्लू अर्जुनने प्रमोशनदरम्यान केला खुलासा
11
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
12
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
13
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
14
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
15
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
16
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
17
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
18
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
19
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
20
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

ऐश्वर्या हत्याकांडामध्ये सोहेलचा सहभाग उघड

By admin | Published: September 08, 2016 2:20 AM

प्रेमसंबंध तोडू पाहणाऱ्या ऐश्वर्यावर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्याची सुपारी तिच्या प्रियकरानेच दिल्याचे पोलीस तपासात उजडात आले आहे.

वसई : प्रेमसंबंध तोडू पाहणाऱ्या ऐश्वर्यावर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्याची सुपारी तिच्या प्रियकरानेच दिल्याचे पोलीस तपासात उजडात आले आहे. यात बलात्काराचा प्रयत्न असफल झाला असला तरी दीपकने ऐश्वर्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सोहेल आणि दीपकला अटक केली आहे. मात्र, या प्रकरणात सोहेलला सोडून देणाऱ्या पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी बहुजन विकास आघाडीने केलीआहे.विरारच्या विवा महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या ऐश्वर्या अग्रवाल (१९) या तरुणीची शुक्रवारी तिच्या प्रियकराचा मित्र दीपक वाघरी (२८) याने कुऱ्हाडीचे सतरा वार करून आपल्या घरात निर्घृण हत्या घडवून आणली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणात हत्या करणारा वाघरी आणि ऐश्वर्याचा प्रियकर सोहेल शेख याला अटक केली आहे. सोहेलनेचे ऐश्वर्याची हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ऐश्वर्या आणि सोहेल यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून ती सोहेलला टाळत होती. त्यामुळे ऐश्वर्याची हत्या करण्याचे त्याने ठरवले. हत्येची सुपारी त्याने आपला मित्र दिपक वाघरी याला दिली होती. ऐश्वर्याला दिपकच्या घरी भेटायला बोलवून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करायची असा कट असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जर्नादन परबकर यांनी दिली. ऐश्वर्या टाळू लागल्याने सोहेल त्रस्त झाला होता. त्यामुळे संतापलेल्या सोहेलने आपला मित्र दीपक वाघरी याच्याशी संगनमत करून ऐश्वर्याची हत्या करण्याचा कट रचला होता. शुक्रवारी दुपारी सोहेलेने ऐश्वर्याला ठरलेल्या योजनेनुसार विरार येथील दीपकच्या घरी बोलावले. यावेळी सोहेल बाजूला लपून बसला होता. दिपकने ऐश्वर्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ऐश्वर्याने विरोध केल्याने दिपकचा प्रयत्न फसला. त्यामुळे त्याने ठरलेल्या योजनेनुसार ऐश्वर्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. यानंतर सोहेल घटनास्थळी पोहोचला आणि दीपकने हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. हत्या घडल्यानंतर पोलिसांनी दीपक एकट्याला दोषी ठरवत त्याला अटक केली होती. तर सोहेलला सोडून दिले होते. ऐश्वर्याच्या पालकांनी सोहेलही यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. तसेच रात्री विरारमध्ये सोहेलला अटक करावी यासाठी कँडल मार्च काढण्यात आला होता. वाढता दबाव पाहून पोलिसांनी सोहेलला अटक केली. त्यानंतर पोलीस तपासात सोहेलने हत्येची सुपारी दिल्याची कबुली देऊन हत्याकांडाच्या तपासाला वेगळेच वळण दिले. (प्रतिनिधी)