रब्बीच्या सव्वानऊ लाख हेक्टरवरील पेरण्या उरकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 11:06 AM2019-11-22T11:06:07+5:302019-11-22T11:13:37+5:30
लांबलेल्या पावसाने रब्बीची कामे मंदावली
पुणे : राज्यात रब्बीच्या ९ लाख ३९ हजार १३२ हेक्टरवरील (सरासरीच्या १६ टक्के) पेरण्या उरकल्या असून, पुणे विभागात सर्वाधिक साडेपाच लाख हेक्टरवरील पेरणीची कामे उरकली आहेत. ज्वारी, मका, हरभरा या पिकांच्या कामांना आता वेग आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. पाऊस लांबल्याने यंदा रब्बीच्या पेरण्यांची कामे मंदावली आहेत.
राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार हेक्टर आहे. गेल्या वर्षीच्या (२०१८-१९) रब्बी हंगामात याच काळात १३ लाख ४ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणीची कामे झाली आहेत. यंदा पाऊस लांबल्याने रब्बीची कामे उशिरा सुरु झाल्याने पेरण्यांचा वेग मंदावला आहे.
पुणे विभागातील अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यात रब्बीचे सरासरी १७ लाख ८१ हजार ३४ हेक्टर क्षेत्र आहे. त्या पैकी ५ लाख
५६ हजार २८३ हेक्टरवरील (३१ टक्के) पेरणी झाली आहे. त्याखालोखाल लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या लातुर विभागात ११ लाख १४ हजार २३३ हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे. त्या पैकी ९६ हजार ९६९ हेक्टरवरील (९ टक्के) कामे पूर्ण झाली आहेत.
गव्हाचे १० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र असून, त्या पैकी अवघ्या १४ हजार ४७ हेक्टरवरील पेरणी झाली आहे. मक्याच्या सव्वादोन लाख हेक्टरपैकी ३० हजार ७९४ हेक्टरवर (१४ टक्के) पेरणी झाली.
हरभºयाची १४ लाख ९० हजार २४७ हेक्टरपैकी १ लाख २० हजार ४३३ हेक्टरवरील पेरणी (४ टक्के) झाली आहे. सूर्यफूलाचे सरासरी क्षेत्र ४१ हजार ६३२ हेक्टर आहे. त्यापैकी ५४५ हेक्टरवरील (१ टक्का) पेरणीची कामे उरकली आहेत.
.........
लष्करी अळीचा प्रादुर्भाव
राज्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाख ७८ हजार ५१३ हेक्टर असून, त्यापैकी ७ लाख ६६ हजार ४९९ हेक्टरवरील (२९ टक्के) पेरणीची कामे झाली आहेत. त्यातील ५ लाख ८८ हजार ६९८ हेक्टर क्षेत्र एकट्या सोलापूर जिल्ह्यात आहे.
च्सोलापुरातील ज्वारीच्या २ लाख होक्टरवरील पेरण्या झाल्या आहेत. सोलापुरात रब्बी ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे कृषी विभागातील अधिकाºयांनी सांगितले.