- राजरत्न सिरसाटअकोला : साप्ताहिक बाजार सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोयाबीनचे दर प्रतिक्ंिवटल ३,८७५, ते ३,९०० रुपयांपर्यंत पोहोचले असून, हमीभावापेक्षा हे दर सरासरी १,२०० रुपयांनी अधिक आहेत. अर्जेंटिंना आणि ब्राझीलमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने हे दर वाढले असून, यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तुळात वर्तविली जात आहे. सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता ‘लोकमत’ने मागील महिन्यात वर्तविली होती, हे विशेष.सोयाबीनचे मुख्य उत्पादक असलेल्या अर्जेंटिनामध्ये सहा कोटी टन, तर ब्राझीलमध्ये हे उत्पादन १० कोटी टन होते; तथापि पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी दोन्ही देशातील सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटल्याने सोयाबीनच्या दरात तेजी आली आहे. येत्या दहा दिवसांत अर्जेंटिना येथे पाऊस न आल्यास आणखी ५० दशलक्ष टन सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.राज्यात खरीप हंगामात ३७ लाखांवर सोयाबीनचा पेरा झाला होता. विदर्भात हे क्षेत्र १७ लाख हेक्टरवर होते. विदर्भात सुरुवातीला पाऊस लांबल्याने या पिकावर त्याचे प्रतिकूल परिणाम झाले होते. परिणामी उत्पादन प्रचंड घटले,एकरी सरासरी ५० किलो ते दीड क्ंिवटल, असा उतारा लागल्याने शेतकरी त्रस्त होता; पण पैशाची प्रचंड निकड असल्याने अल्पभूधारक शेतकºयांनी सुरुवातीलाच १८०० ते २००० रुपये प्रतिक्ंिवटल दराने विक्री केली.हमीदर प्रतिक्ंिवटल २,६७५ रुपयेकेंद्र शासनाने गतवर्षी सोयाबीनचे हमीदर २ हजार ६७५ रुपये जाहीर केले आहेत. २०० रुपये बोनसही मिळणार आहे. हमीदर आणि बोनस मिळून शेतकºयांना ३ हजार ५० रुपये प्रतिक्ंिवटल मिळणार आहेत; पण शासकीय खरेदी केंद्रावर प्रतवारीचे निकष कडक करण्यात आल्याने शेतकºयांनी बाजारात सोयाबीन विक्री केली. आता मात्र हे दर ३,९०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.अर्जेंटिना व ब्राझीलमध्ये सोयाबीनचे उत्पादन घटल्याने भारतीय बाजारात तेजी आली असून, ३,९०० रुपये प्रतिक्ंिवटलने खरेदी सुरू आहे. दरात वाढ होण्याची शक्यता आहे.- वसंत बाछुका, उद्योजक, अकोला
सोयाबीनचे दर ३,९०० रुपयांवर! हमीभावापेक्षा १,२०० रुपये जादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 4:40 AM