राज्यात दिवसभरात २६ हजार ४०८ रुग्ण झाले कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 07:56 AM2020-09-21T07:56:17+5:302020-09-21T07:56:32+5:30
आतापर्यंत १२ लाख बाधित : ३२ हजार ६७१ जणांनी गमावला जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दिवसभरात २६ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण ८ लाख ८४ हजार ३४१ रुग्ण कोविडमुक्त झाले. रविवारी २० हजार ५९८ कोरोनाबाधित रुग्ण आणि ४५५ मृत्युंची नोंद झाली. परिणामी, राज्यात १२ लाख ८ हजार ६४२ कोरोनाबाधित झाले असून, मृतांचा आकडा ३२ हजार ६७१ झाला आहे.
सध्या २ लाख ९१ हजार २३८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३.१७ टक्के असून, मृत्युदर २.७ टक्के आहे. दिवसभरात नोंदविण्यात आलेल्या ४५५ मृत्यूंपैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १०९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १०८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत.
४५५ मृत्युंमध्ये मुंबई ४४, ठाणे ५, ठाणे मनपा ६, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा ८, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा ४, मीरा-भार्इंदर मनपा ५, पालघर १, वसई-विरार मनपा ३, रायगड ६, पनवेल मनपा २, नाशिक ९, नाशिक मनपा ४, अहमदनगर १४, अहमदनगर मनपा २, धुळे १३, धुळे मनपा ८, जळगाव ७, जळगाव मनपा ५, पुणे २९, पुणे मनपा १७, पिंपरी-चिंचवड मनपा १०, सोलापूर ५, सोलापूर मनपा १, सातारा १४, कोल्हापूर ८, कोल्हापूर मनपा ३, सांगली १२, सांगली-मिरज-कुपवाड मनपा ४, रत्नागिरी २२, औरंगाबाद १६, औरंगाबाद मनपा ५, जालना १, हिंगोली १, परभणी १, परभणी मनपा १, लातूर १३, लातूर मनपा ५, उस्मानाबाद १७, बीड ६, नांदेड ६, नांदेड मनपा १, अकोला १, अमरावती ४, अमरावती मनपा १, यवतमाळ १, बुलढाणा १, वाशिम १, नागपूर १९, नागपूर मनपा ३५, वर्धा १, भंडारा ९, गोंदिया १, चंद्रपूर २, गडचिरोली ३ आणि अन्य राज्य/देशातील १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
राज्यात
सप्टेंबरच्या पंधरवड्यानंतर सक्रिय रुग्णांच्या संख्येचा आलेख कमी होताना
दिसत असल्याची समाधानकारक बाब समोर आली आहे.