दिलासा! राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे ३८ प्रकल्प सुरू, दिवसाला होतेय ५३ मेट्रीक टन उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 07:38 PM2021-05-06T19:38:47+5:302021-05-06T19:40:18+5:30

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

The state gov has started 38 projects to generate oxygen from the air, producing 53 metric tons oxygen per day | दिलासा! राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे ३८ प्रकल्प सुरू, दिवसाला होतेय ५३ मेट्रीक टन उत्पादन

दिलासा! राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे ३८ प्रकल्प सुरू, दिवसाला होतेय ५३ मेट्रीक टन उत्पादन

Next

मुंबई - ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए ) बसविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे  ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.  (The state gov has started 38 projects to generate oxygen from the air, producing 53 metric tons oxygen per day)

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात १२५० मेट्रीक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत असून त्याची मागणी १७५० मेट्रीक टन एवढी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी इतर राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरही ऑक्सिजन निर्मिती व्हावी यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. 

CoronaVirus : भारतात खतरनाक झालाय कोरोनाचा डबल म्यूटेंट, सरकारनं सांगितलं...

टोपे म्हणाले, ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे ३५० प्लांट बसविण्याचे नियोजन असून त्याद्वारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट आहे.

राज्यात कार्यान्वित झालेले हे ३८ पीएसए प्रकल्प बुलढाणा, वाशीम, बीड, लोखंडी सावरगाव, हिंगोली, जालना,नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, गोंदिया, अहमदनगर, शिरपूर, भुसावळ, नंदूरबार, शहादा, सातारा, पुणे, बुलढाणा, चिखली, खामगाव येथील जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये याठिकाणी उभारण्यात आले आहेत.

CoronaVirus: कोरोनावर मात करण्यासाठी गाईचं दूध बनलंय चिनी लोकांचं 'हत्यार'!

वाशिम, सातारा, हिंगोली, अहमदनगर,भंडारा, अलिबाग, रत्नागिरी, बुलढाणा, उस्मानाबाद आणि सिंधुदूर्ग येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या मदतीने हवेतील ऑक्सिजन शोषून तो शुद्ध करून रुग्णांना पुरविणारे पीएसए प्लांट बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे जाणवणाऱ्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रकल्पातील ऑक्सिजनचा वापर हा रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

Web Title: The state gov has started 38 projects to generate oxygen from the air, producing 53 metric tons oxygen per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.